मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या मालकीचा संघ एमआय न्यूयॉर्कने मेजर लीग 2023 चे विजेतेपद दिमाखात पटकावले. कर्णधार निकोलस पूरन याच्या झंझावातामुळे एमआय न्यू यॉर्कसाठी हा विजय अगदी सोपा झाल्याचे पाहायला मिळाले. पूरनने 137 धावांची नाबाद खेळी करत अंतिम सामन्यात एमआयला विजय मिळवून दिला आणि सामनावीर ठरला. त्याने या सामन्यात मारलेल्या सर्व 13 षटकारांचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1685902763979685888?t=iBQ6ebPKaANFqZZDHUONTA&s=19
एमआय न्यूयॉर्क संघाला अंतिम सामन्यात विजयासाठी सिएटल ऑर्कास संघाकडून 184 धावांचे लक्ष्य मिळाले होते. निकोलस पूरन याने 55 चेंडूत नाबाद 137 धावा केल्यामुळे एमआयने हे लक्ष्य अवघ्या 16 षटकात आणि 7 विकेट्स राखून गाठले.
शून्यावरच सलामीवीर जोन्स बाद झाल्यानंतर पूरनने मैदानावर पाऊल ठेवले. त्याने विरोधी संघाच्या एकाही गोलंदाजावरदयामयाने दाखवता अगदी पहिल्यापासून फटकेबाजीला सुरुवात केली. सोळाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विजयी लक्ष पार होईपर्यंत त्याने मैदानाच्या चारही कोपऱ्यात अक्षरशा चौकार षटकारांची आतिषबाजी केली. त्याने दहा चौकार आणि तब्बल तेरा षटकार ठोकले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 249.9 असा राहिला. तुम्ही देखील त्याने मारलेले हे 13 गगनचुंबी षटकार पाहू शकता.
पूरन हा सध्या शानदार फॉर्ममधून जात आहे. आयपीएल मध्ये त्याने लखनऊ संघासाठी जबरदस्त कामगिरी केली होती. त्यानंतर झालेल्या विश्वचषक पात्रता फेरीत वेस्ट इंडीज संघाला अपयश आले तरी त्याची बॅट चांगलीच बोलली होती. त्याने स्पर्धेत दोन शतके झळकावलेली. त्यानंतर या स्पर्धेत देखील प्रत्येक सामन्यात तो चांगली कामगिरी करताना दिसलेला. त्यानंतर अंतिम सामन्यात स्वतः जबाबदारी घेत कर्णधाराला साजेशी खेळी करत त्याने संघाला विजेतेपद मिळवून दिले
(Full Video Of Nicholas Pooran All 13 Sixes In MLC Final)
महत्वाच्या बातम्या –
ASHES 2023 । चौथ्या दिवसाखेर इंग्लिश चाहत्याचा ख्वाजाशी पंगा! लॅबुशेननं मागे वळून काय केलं पाहाच
धोनीने कलेक्शनमधून बाहेर काढली ‘ही’ जबरदस्त मसल कार, रांचीत ड्राईव्ह करतानाचा व्हिडिओ व्हायरल






