फन फिटनेस आणि पुणेरी वॉरियर्सने रविवारी पीडीएफए लीग २०२१-२२ च्या १४ वर्षांखालील आणि महिला लीगमध्ये सहज विजय मिळवला.
एसएसपीएमएस मैदानावर, फन फिटनेसने सनराइज एससीचा ४-२ असा पराभव केला. फन फिटनेसने प्रणव शेट्टी (२रा) द्वारे लवकर गोल केला त्याआधी रियान जैन (५वा, १६वा) आणि रचित भटेवरा (३२वा) याने केलेल्या गोलने संघाला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. सनराईज स्पोर्ट्स क्लबने चिन्मय ढाकुलकर (३४) आणि निहार जाधव (३९) यांच्या गोलमुळे दोन गोल मागे खेचले.
महिला लीगच्या सुपर-६ चकमकीत पुणेरी वॉरियर्सने उत्कर्ष क्रीडा मंचचा २-० असा पराभव करत तिसरा विजय नोंदवला. निलिशा संकेत (३०+१) आणि साक्षी बने (५९) यांच्या प्रत्येकी एका गोलने पुणेरी वॉरियर्सला विजय मिळवून दिला.
निकाल
एसएसपीएमएस, १४ वर्षांखालील
स्पोर्टिव्ह एफए: २ (प्रथमेश निनावे २६ वा, श्रेयस जाधव 38वा) वि. वि. पुणेरी वॉरियर्स: १ (आदर्श कमन २१ वा)
फन फिटनेस: ४ (प्रणव शेट्टी २रा; रियान जैन ५वा, १६वा; रचित भटेवरा ३२वा) वि. वि. सनराईज स्पोर्ट्स क्लब: २ (चिन्मय ढाकुलकर ३४वा; निहार जाधव ३९वा)
मॅथ्यू एफए: २ (अर्चित आंबवणे ३१वे; यश देठे ४०वे) वि. वि. उत्कर्ष क्रीडा मंच: ०
गेम ऑफ गोल फसीसी: ३ (नीलकंठ मोरे २५ वा; रणवीर बैस ३१वा, ४७वा) वि. वि. दिएगो ज्युनियर्स: 0
महिला लीग, सुपर-६
अस्पायर एफसी: ० बरोबरी वि. डेक्कन इलेव्हन ०
पुणेरी वॉरियर्स: २ (निलीशा संकेत ३०+१; साक्षी बने ५९वा) वि वि उत्कर्ष क्रीडा मंच: ०
स्निग्मय एफसी: २ (तनया गायकवाड २६वा; ऍलिसन विन्टल ५८वा) वि वि सिटी गर्ल्स गो स्पोर्ट्स: १ (पियुशा नरके ३७वा )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिराजच्या झटक्याने इंग्लंडची धुळधान, भारताला पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी
भारताच्या वेगवान गोलंदाजांनी रचलाय इतिहास, कसोटी मालिकेत पहिल्यांदाच घेतल्या ‘एवढ्या’ विकेट्स
विराटची स्लेजिंग टीम इंडियाला नडली? शाब्दिक चकमकीनंतर बेयरस्टोचे झंजावाती शतक