भारताचा उदोयन्मुख खेळाडू रिषभ पंतचा पाय वडिलांच्या अंत्यविधी प्रसंगी भाजला. बुधवारी रात्री रिषभ पंतच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे रिषभ पंत लगेच आयपीएलच्या कॅम्पमधून रुकरी या आपल्या गावी गेला. तेव्हा वडिलांच्या अंत्यविधी प्रसंगी ही घटना घडली. राजेंद्र पंत (रिषभचे वडील ) यांचं वयाच्या ५३व्या वर्षी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
रिषभ पंत हा एक अतिशय गुणी आणि प्रोफेशनल खेळाडू असल्यामुळे आपला दिलेला शब्द पूर्ण करणार आहे. तो लवकरच दिल्लीच्या संघाबरोबर दिसेल. सध्या रिषभ दिल्ली डेरडेव्हिल्स संघाचा महत्वाचा भाग आहे. दिल्लीची आयपीएल संघही तेवढाच आशावादी आहे. त्यांनी रिषभची जखम खूप गंभीर नसेल अशी अशा व्यक्त केली.
२०१६-१७ चा देशांतर्गत क्रिकेट मोसम अतिशय चांगला राहिलेल्या पंतकडून दिल्लीला प्रचंड अपेक्षा आहेत. रिषभने रणजी सहित सर्वच स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि अशीच कामगिरी झहीर खानच्या नेतृत्वाखालील दिल्ली डेरडेव्हिल्स संघाकडून होईल अशी सर्वजण अपेक्षा करत आहे.
१९ वर्षीय पंतने ह्या रणजी मोसमात ८१ च्या सरासरीने तब्बल ९७२ धावा केल्या आहेत. ४ शतकांसह पंतने तब्बल १०७ चा स्ट्राईक रेट सुद्धा राखला होता. त्या ४ शतकात पंतने एक त्रिशतकही केले आहे.
ह्याच कामगिरीच्या आधारे त्याला भारतीय राष्ट्रीय टी२० संघात इंग्लंड विरुद्ध संधी देण्यात आली होती.