---Advertisement---

एका फलंदाजामुळे दुसरा फलंदाज झेलबाद…! मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच

On: बुधवार, जुलै 17, 2024 7:55 PM
Cricket
---Advertisement---

क्रिकेटमध्ये काही वेळा खूप विनोदी गोष्टी पाहायला मिळतात. तर काही वेळेस खूप भावनिक क्षण पाहायला मिळतात. त्यामध्ये चाहते खेळाचा आनंद लुटतात. पंरतू क्रिकेटमध्ये नाॅन स्ट्रायकर फलंदाजाच्या चुकीमुळे दुसरा फलंदाज बाद झाल्याचं खूप कमीवेळा पाहिलं असेल. इंग्लंडमधील एका देशांतर्गत सामन्यादरम्यान नॉन स्ट्रायकर फलंदाजानं सहकारी खेळाडूला झेलबाद केल्याची घटना घडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

इंग्लंडमधील देशांतर्गत दुसऱ्या इलेव्हन टी20 सामन्यादरम्यान सोमरसेट आणि यॉर्कशायर यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान नाॅन स्ट्रायकरची चूक नसली तरी त्याच्या सहकारी फलंदाजाला झेलबाद व्हावे लागले.

 

ही घटना सोमरसेटच्या डावाच्या 19व्या षटकात घडली. बेन क्लिफ गोलंदाजी करत होता आणि नेड लिओनार्ड स्ट्राइकवर होता आणि त्यानं त्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. परंतू हा चेंडू नाॅन स्ट्राईकवर फलंदाला लागला आणि सरळ गोलंदाच्या हातामध्ये गेला. नेड लिओनार्ड या फलंदाजाला बाद होऊन तंबूत परतावे लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर मजेशीर कमेंट्सही येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“टी20 संघात विराट-रोहितची जागा कोणीही घेऊ शकत नाही”, कपिल देव असं का म्हणाले?
भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबद्दल श्रीलंकन खेळाडूंनी दिली प्रतिक्रिया
सूर्या-हार्दिकपेक्षा चांगला कर्णधार बनू शकतो श्रेयस अय्यर, ही आहेत 3 मोठी कारणं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---