अनेकदा खेळात खेळाडू आपले संतूलन गमवल्याचे पाहायला मिळत असतात. त्यामुळे अनेकदा खेळ सुरू असताना खेळाडूंमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळतं. मात्र, जर खेळ संपल्यानंतर दोन संघांच्या मॅनेजरमध्ये झांडण झाले आणि गोष्ट हाणामारीपर्यंत पोहोचली तर काय होईल?, अशीच काहीसी घटना घडली आहे रविवारी (१४ ऑगस्ट) रोजी. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये रविवारी चेल्सी आणि टोटेनहॅम हॉटस्पर यांच्यात खेळवण्यात आलेला सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. मात्र, या सामन्याचा निकाल लागल्यानंतर जे काही झालं ते पाहण्यासारख होतं.
Things got HEATED between Thomas Tuchel and Antonio Conte after a dramatic 2-2 draw between Chelsea and Tottenham. 👀pic.twitter.com/qmKs1cUfpk
— Sky Sports News (@SkySportsNews) August 14, 2022
या सामन्यादरम्यान दोन्ही संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना दोन्ही संघांचे व्यवस्थापकही या सामन्यादरम्यान थंडावले आणि चांगलाच गोंधळ उडाला. जर हस्तक्षेप झाला नसता तर अँटोनियो कॉन्टे आणि थॉमस टुचेल यांच्यात हाणामारी झाली असती. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा