आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा ही भारतीय टी२० संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची शेवटची स्पर्धा ठरली. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय टी२० संघाचे कर्णधारपद रोहित शर्माच्या हाती देण्यात आले आहे. यापूर्वी रोहित शर्मा उपकर्णधाराची भूमिका पार पाडत होता. परंतु, तो आता पूर्णवेळ कर्णधार असणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी२० मालिकेत न्यूझीलंड संघावर ३-० ने विजय मिळवला आहे. यासह रोहित शर्माने मालिकेतील तीनही सामन्यात नाणेफेक जिंकले होते. त्यामुळे नेटकरी सक्रीय झाले असून त्यांनी विराट कोहलीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत रोहित शर्माने एकदाही नाणेफेक गमावली नाही. २०१९ नंतर पहिल्यांदाच असे घडले आहे की, कुठल्या भारतीय कर्णधाराला सलग ३ वेळेस नाणेफेक जिंकण्यात यश आले आहे, तर दुसरीकडे विराट कोहली टी२० संघाचा कर्णधार असताना त्याला नाणेफेक जिंकण्यात सातत्याने अपयश येत होते.
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सलग ३ वेळेस गमावली नाणेफेक
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीच्या हाती होते. परंतु, त्याला पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकण्यात यश आले नव्हते. सलग ३ सामन्यात नाणेफेक गमावणे भारतीय संघाला खूप महागात पडले होते. कारण न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. ज्यामुळे भारतीय संघाला उपांत्यफेरीत प्रवेश करता आला नव्हता.
रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेत सलग ३ वेळेस नाणेफेक जिंकल्यानंतर नेटकऱ्यांनी विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. एका युजरने चक दे इंडिया चित्रपटातील एक फोटो शेअर करत लिहिले की, “असं काय आहेत त्यात, जे माझ्यात नाहीये.” तर दुसऱ्या एका युजरने एका जाहिरातीचा फोटो शेअर केला आहे, ज्यावर कॅप्शन म्हणून,” भाई तू कैसे कर रहा है,” असे लिहिले आहे.
https://twitter.com/Soul_of_Queen/status/1462412835250606080?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1462412835250606080%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=about%3Asrcdoc
#ViratKohli right now. #RohitSharma #INDvsNZ pic.twitter.com/rrHC0pdSXR
— ALPHA ACADEMY OF BATSMEN (@prabuddha45) November 21, 2021
Virat Kohli to the Toss coin:#INDvNZ pic.twitter.com/ntXO5xRdoi
— ComeOn Cricket 🏏🇮🇳 (@ComeOnCricket) November 21, 2021
Rohit Sharma win another toss!!!
Meanwhile Virat Kohli : pic.twitter.com/MedCcEH9I1— Adi Gurjar🇮🇳 (@LoveMeme30) November 21, 2021
Kohli seeing Rohit winning toss and feel like: pic.twitter.com/gSnBuu5VJs
— Ankit 🔥 (@ankitwa07) November 21, 2021
#INDvsNZ
NobodyRohit Sharma at Eden gardens: pic.twitter.com/469EqSe7Pn
— Sagar V (@sa_garv) November 21, 2021
Finally cracked why Virat Kohli losses every toss and Rohit Sharma wins every toss 😂😂#INDvsNZ| Ishaan | Rituraj #RohitSharma #viratkholi #IndianCricketTeam #BCCI pic.twitter.com/Oi91ZNltZK
— Shreshth Mehta (@ShreshthMehta) November 21, 2021
#INDvsNZ #toss #ViratKohli #RohitSharma @Cricketracker#MEMES @imVkohli watching @ImRo45 winning all three Tosses against @BLACKCAPS 😂😂 pic.twitter.com/93nMPHV7lZ
— Ashish Jeswani (@Ashjes149) November 21, 2021
Rohit Sharma the Toss, Match and Series winner #INDvNZ pic.twitter.com/p0SOjWVgjZ
— djay (@djaywalebabu) November 21, 2021
Virat Kohli watching Rohit Sharma's luck with toss wins pic.twitter.com/Q4VXe7MKdl
— The Educated Moron (@EducatedMoron) November 21, 2021
#INDvsNZ
*After Rohit Sharma won the toss three times in a row* pic.twitter.com/u8twFGqxnV— Til wali Kanya🌼🇮🇳 (@UPkiKanyaaa) November 21, 2021
Rohit Sharma after winning the toss: pic.twitter.com/l6UkR6W1Jv
— Aarohi Tripathy 🇮🇳 (@aarohi_vns) November 21, 2021
https://twitter.com/tiranga__1/status/1462410758570999818
तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी देखील एक मीम शेअर केला आहे. ज्यावर त्यांनी संजय दत्तच्या एका डायलॉगचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर “ए आला टॉस जितने का आदत हो गया है हमको,” असे लिहिले आहे.
#INDvNZ pic.twitter.com/qoUITrdlhG
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 21, 2021
रोहितने न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेत नेतृत्त्व करताना मालिकावीर पुरस्कार देखील जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
मोठी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पसरले भीतीचे वातावरण! श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना झाली कोरोनाची लागण
न्यूझीलंडचा ३-० ने धुव्वा उडवण्यात ‘या’ ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची भूमिका