ऑस्ट्रेलियामध्ये सध्या क्रिकेटचे वारे वाहत असून भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिके सोबतच बिग बॅश लीग स्पर्धा देखील सुरू आहे. बिग बॅश लीग मध्ये मोठ्याप्रमाणावर उत्कंठावर्धक सामने क्रिकेट रसिकांना बघायला मिळत आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने बिग बॅश लीग स्पर्धा नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच पार पडलेल्या पर्थ स्कॉचर्स आणि सिडनी थंडर मधील सामन्यात एक विनोदी रन आऊट बघायला मिळाला आहे.
सिडनी थंडरच्या डावातील 6 व्या षटकात फलंदाज सॅम बिलिंगने चेंडू अलगद ढकलत एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, यावेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या जेसन बेरनडॉफने चेंडू यष्टीरक्षक इंगल्सकडे फेकला. इंगल्स चेंडू पकडण्यात यशस्वी ठरला नाही व चेंडू त्याच्या हाताला लागून स्टम्पच्या जवळ पडला मात्र तेथून चेंडूने टर्न घेत स्टम्पला जावून आदळला. यादरम्यानच फलंदाज ॲलेक्स रॉस रेषे बाहेर असल्याने तो धावबाद झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत असून अनेकांनी त्यावर विनोदी कमेंट्स देखील केलेल्या आहेत.
You are KIDDING me!!! Jason Roy's reaction to this run out is golden! 😂😂@BKTtires | #BBL10 pic.twitter.com/JDhIJ8CjLW
— cricket.com.au (@cricketcomau) January 9, 2021
दरम्यान सामन्याचा विचार केला असता, प्रथम फलंदाजी करणाऱ्या पर्थ स्कॉचर्सने नियमित 20 षटकात 6 गडी गमावत 185 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात सिडनी थंडरचा पूर्ण डाव केवळ 168 धावांवरच आटोपला व पर्थने 17 धावांनी सहज विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या:
पॅट कमिन्सची गोलंदाजी आणि भारतीय फलंदाजाला दुखापत, हे समीकरण तर ठरलेलंच! पाहा अजब योगायोग
दुःखद.! झहीर खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे झाले निधन