---Advertisement---

सिडनी कसोटीत स्मिथच्या फलंदाजीचा बोलबाला, खोऱ्याने धावा काढत ‘या’ यादीत घेतली टॉप-१० मध्ये उडी

On: रविवार, जानेवारी 10, 2021 9:41 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असून आज (१० डिसेंबर) या सामन्याचा चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाखेर अर्धशतकी भागिदारी पूर्ण केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅब्यूशाने आणि स्टिव्ह स्मिथ यांनी मिळून २ बाद १०५ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र भारताचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने ७३ धावांवर लॅब्यूशानेची विकेट काढून त्यांची भागिदारी मोडली. त्यानंतर स्मिथदेखील लवकरच बाद झाला. तरीही त्याने नवा किर्तीमान आपल्या नावे केला आहे.

या ३१ वर्षीय शिलेदाराने लँच ब्रेकपर्यंत १६७ चेंडूत १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. यासह ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्मिथने टॉप-१० मध्ये उडी घेतली आहे. पहिल्या डावातील १३१ धावांची शतकी खेळी आणि दुसऱ्या डावातील अर्धशतक अशा एकूण २१२ धावा त्याने या सामन्यात केल्या आहेत. त्यामुळे कसोटी कारकिर्दीतील ७६ सामन्यात ७४४९ धावा करत तो ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा नववा फलंदाज ठरला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांमध्ये संघ प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांचे नाव अव्वलस्थानी आहे. त्यांनी १६८ कसोटी समन्यात १३३७८ धावा केल्या आहेत. तर ऍलन बॉर्डर आणि स्टिव्ह वॉ १० हजारपेक्षा जास्त धावांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. या तीन ऑस्ट्रेलियन दिग्गजांचा अपवाद वगळता इतर कुणीही १० हजार धावांचा आकडा गाठलेला नाही.

ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या १० फलंदाजामध्ये मिचेल क्लार्क, मॅथ्यू हेडन, मार्क वॉ, जस्टीन लँगर, मार्क टेलर आणि डेविन बून यांचाही समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

१३३७८ धावा- रिकी पाँटिंग
१११७४ धावा- ऍलन बॉर्डर
१०९२७ धावा- स्टिव्ह वॉ
८६४३ धावा- मिचेल क्लार्क
८६२५ धावा- मॅथ्यू हेडन
८०२९ धावा- मार्क वॉ
७६९६ धावा- जस्टीन लँगर
७५२५ धावा- मार्क टेलर
७४४९ धावा- स्टिव्ह स्मिथ
७४२२ धावा- डेविड बून

चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताला तीन यश 

ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला ५ बाद २१० धावा फलकावर नोंदवल्या आहेत. यामुळे ऑस्ट्रेलियाने जवळपास ३०० धावांपर्यंतची आघाडी घेतली आहे. डेविड वॉर्नर (१३ धावा), विल पुकोवस्की (१० धावा) या सलामीविरांनी तिसऱ्या दिवशीच विकेट गमावली होती. भारतीय गोलंदाज नवदीप सैनी आणि सबटिट्यूट यष्टीरक्षक वृद्धिमान साहा यांनी मिळून चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला लॅब्यूशाने आणि मॅथ्यू वेडच्या रुपात ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले. तसेच फिरकीपटू आर अश्विनने स्मिथला पायचित करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

“उर्वरित सामन्यात आम्हाला जडेजाची उणीव भासेल”, पुजाराने दिली प्रतिक्रिया

हे तर आठवे आश्चर्य! चक्क मांजरेकरांनी केले जडेजाचे कौतुक, म्हणाले…

पुजारा विरुद्ध ‘या’ रणनीतीने गोलंदाजी केल्याने मिळाले यश, पॅट कमिन्सने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---