---Advertisement---

78 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! चिन्मय सुतारच्या रणजी ट्रॉफीच्या एका डावात 400 धावा, ब्रायन लारा-डॉन ब्रॅडमनच्या खास लिस्टमध्ये एंट्री

On: सोमवार, ऑक्टोबर 19, 2026 6:33 PM
---Advertisement---

सोमवारी (१९ ऑक्टोबर) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक खेळी खेळली गेली. चिन्मय सुतार हा रेड बॉल क्रिकेटच्या एका डावात ४०० धावांचा टप्पा गाठणारा केवळ दुसराच भारतीय ठरला. त्याने ही कामगिरी रणजी ट्रॉफी प्लेट गटात मिझोरमकडून खेळताना नागालॅंडविरुद्ध खेळी. तो प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका डावात ४०० किंवा ४०० पेक्षा अधिक धावा करणारा केवळ १० वा फलंदाज (१२ वी घटना) ठरला.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूने ४०० धावांचा टप्पा पहिल्यांदा भाऊसाहेब निंबाळकर यांनी गाठला. त्यांनी १९४८ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना काठियावाडविरुद्ध नाबाद ४४३ धावा केल्या होत्या. आता सुतारने त्यांच्या खास यादीत स्थान मिळवले आहे.

सुतार हा प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका डावात ४०० किंवा ४०० पेक्षा अधिक धावा करणारा केवळ १० वा फलंदाज ठरला. तो नागालॅंडविरुद्ध ५१७ चेंडूंत ४६ चौकार आणि ७ षटकार मारून नाबाद राहिला.

प्रथम श्रेणी क्रिकेटचा इतिहास पाहिला तर, सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर आहे. त्याने १९९४ मध्ये वॉरविकशायरकडून खेळताना डरहॅमविरुद्ध नाबाद ५०१ धावा केल्या होत्या. नंतर त्याने वेस्ट इंडिजकडून खेळताना इंग्लंडविरुद्ध पुन्हा एकदा ४०० धावांचा टप्पा गाठला होता. २००४ मध्ये खेळल्या गेलेल्या त्या कसोटी सामन्यात ब्रायन लारा ४०० धावांवर नाबाद राहिला होता.

प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका डावातील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या
५०१* – ब्रायन लारा (वॉरविकशायर) विरुद्ध डरहॅम, १९९४
४९९ – हनिफ मोहम्मद (कराची) विरुद्ध बहवालपूर, १९५९
४५२* – डॉन ब्रॅडमन (न्यू साऊथ वेल्स) विरुद्ध क्वीन्सलॅंड, १९३०
४४३* – भाऊसाहेब निंबाळकर (महाराष्ट्र) विरुद्ध काठियावाड, १९४८
४३७ – बिल पॉन्सफोर्ड (व्हिक्टोरिया) विरुद्ध क्वीन्सलॅंड, १९२७
४२९ – बिल पॉन्सफोर्ड (व्हिक्टोरिया) विरुद्ध टास्मानिया, १९२३
४२८ – अफताब बलोच (सिंध) विरुद्ध बलुचिस्तान, १९७४
४२४ – आर्ची मॅकलॅरेन (लॅंकशायर) विरुद्ध समरसेट, १८९५
४१०* – सॅम नॉर्थईस्ट (ग्लॅमॉर्गन) विरुद्ध लिसेस्टरशायर, २०२२
४०५* – ग्रॅमी हिक (वॉर्सेस्टरशायर) विरुद्ध समरसेट, १९८८
४००* – ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) विरुद्ध इंग्लंड, २००४
४००* – चिन्मय सुतार (मिझोरम) विरुद्ध नागालॅंड, २०२६

चिन्मयच्या भन्नाट फलंदाजीमुळे मिझोरमने पहिला डाव ५८१ धावसंख्येवर घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता नागालॅंडने पहिल्या डावात एक विकेट गमावून ५० धावा केल्या आहेत. हा सामना दिमापूरच्या सोविमा येथिल नागालॅंड क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.

चिन्मयच्या या खेळीचे आणखी एक विशेष म्हणजे त्याने आपल्या दुसऱ्याच प्रथम श्रेणीच्या सामन्यात ही विक्रमी खेळी केली. (Chinmay Sutar scores 400 runs in Ranji Trophy Plate enters an exclusive list alongside Brian Lara and Don Bradman)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---