इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीत भारतीय संघ भक्कम स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसाखेर भारताने 322 धावांची आघाडी घेतली. कर्णधार रोहित याच्या नेतृत्वात भारतीय संघ मालिकेतील या तिसऱ्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे. शनिवारी (17 फेब्रुवारी) राजकोट कसोटीत एकूण 10 विकेट्स पडल्या, तर यशस्वी जयस्वालच्या रुपात एक खेळाडू रिटायर्ड हर्ट झाला. यादरम्यान, भारतीय संघाला धावगती राखता आली नाही, असे समोर येत आहे. रोहित शर्माचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या ताबतोड फलंदाजी आणि नेतृत्वासाठी ओळखला जातोच. पण मैदानात त्याचे बोलणे आणि मजामस्ती करण्यासाठी भारतीय कर्णधाराची ख्याती आहे. रोहितचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत रोहित हिंदीत म्हणत आहे, “जल्दी मांगो बॉल यार, हम लोग तीन ओव्हर पीछे है. अगर ये ऑलआउट हो गये तो मग लोगों को बो लगेगा.”
रोहित हे वाक्य मोहम्मद सिराज याचे षटक पूर्ण झाल्यानंतर म्हणताना दिसला. भारतीय संघ त्यावेळी षटकांची गती राखण्यात मागे पडला होता. अशात दोन षटकांमधील मोकळ्या वेळेत ही षटकांची गती पुन्हा जागेवर आणण्यासाठी रोहित प्रयत्न करताना दिसतो. याच कारणास्तव संघातील खेळाडूंना एक षटक संपल्यानंतर लगेच चेंडू मागून घ्या असे सांगताना दिसत आहे. पण यावेळी त्याने उल्लेख केलेला ‘वो’ म्हणजे नक्की काय, असा प्रश्न अनेकांना पडाल आहे. तर त्याचे उत्तर पेनल्टी असे असू शकते. कारण आयसीसीच्या नियमानुसार जर एखाद्या संघाला षटकांची गती राखता आली नाही, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केले जाते.
Rohit said ” Jaldi to mangao ball yaar, hum log teen over piche hai, agar ye log all out hogaye na to hmlog ko wo lagega 😭😭” pic.twitter.com/8Iqsfp8xuY
— Kuljot Singh (@KuljotSingh_4_5) February 17, 2024
अशात रोहित संघाच्या फायद्यासाठी मैदानात खेळाडूंवर ओरडत असल्याचे समजू शकते. पण तो वापरत असलेल्या हिंदी भाषेची सोशल मीडियावर चांगलीच मजा घेतली जात आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर समोर येत आहेत. याआधी भारतीय दिग्गज विराट कोहली देखील रोहित शर्माच्या भाषेवर बोलला होता. विराटने सांगितल्याप्रमाणे अनेकदा रोहितला काय म्हणायचे असते, तेच समजत नाही. (Funny video of Rohit Sharma in Rajkot Test is going viral.)
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG : भारताविरुद्ध बेन डकेटने रचला इतिहास, 24 वर्षांत पहिल्यांदाच घडला ‘हा’ पराक्रम
न्यूझीलंडला मोठा झटका! दिग्गज खेळाडू एका वर्षांसाठी संघातून बाहेर, जाणून घ्या कारण