भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) सुरु झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. मात्र, जगातील सर्वोत्कृष्ट संघांमध्ये सामना सुरू असला तरी, सर्व चर्चा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुली यांचीच झाली.
ट्विटरवर गांगुली यांच्या नावाची चर्चा
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली सध्या इंग्लंडमध्ये आहेत. त्यांच्यासह बीसीसीआयचे सचिव जय शहा व बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनादेखील पाहण्यात आले. दुसरा कसोटी सामना सुरू झाला असताना हे सर्वजण सामन्याचा आनंद लुटताना दिसले. मात्र, सर्वाधिक चर्चा सौरव गांगुली यांची झाली.
https://twitter.com/Mrigank96046592/status/1425767584201277450?s=19
Wow Saurav Ganguly and his biggest fan Sir Geoffery Boycott meet again. ‘The prince of Calcutta’ he used to call him in his yorkshire accent 🔥🙃 #engvind pic.twitter.com/ba5YfGSd5s
— Mehran मेहरान 🇮🇳 (@mehranzaidi) August 12, 2021
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या सत्रात गांगुली हे इंग्लंडचे माजी कर्णधार व जगप्रसिद्ध समालोचक जेफ्री बॉयकॉट यांच्याशी चर्चा करताना दिसले. त्यांच्या या चर्चेची छायाचित्रे सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. जेफ्री बॉयकॉट हेच पहिले व्यक्ती होते ज्यांनी सौरव गांगुली यांना ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ अशी पदवी दिली होती. त्यांच्यातील या खास नात्यामुळे चाहते या दोघांना एकत्र पाहून आनंदी झाले आहेत. अनेकांनी आपल्या ट्विटर हँडलवरून या दोघांच्या चर्चेबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Sourav Ganguly with Geoffrey Boycott, who interesting gave Dada the title of the 'Prince of Calcutta'. #ENGvIND pic.twitter.com/bB9arAq33i
— sohom (@AwaaraHoon) August 12, 2021
लॉर्ड्सशी गांगुली यांचे खास नाते
लॉर्ड्स मैदानावर आपल्या कसोटी कारकिर्दीतील सुरुवात करणाऱ्या गांगुली यांनी पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. तसेच, २००२ नेटवेस्ट ट्रॉफीवेळी भारतीय संघाच्या विजयानंतर त्यांनी शर्ट भिरकावत केलेला जल्लोष क्रिकेट चाहते कधीही विसरू शकणार नाहीत.
पहिल्या सत्रात भारताची आघाडी
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय सलामीवीरांनी भारताला दमदार सुरुवात दिली. पहिली नऊ षटके संघाची धावसंख्या एकेरी असतानाही रोहित शर्माने त्यानंतर काहीसे आक्रमक रूप घेऊन धावसंख्या १८.४ षटकात ४६ धावांवर नेली. पावसाचे आगमन झाल्याने पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित व राहुल हे अनुक्रमे ३५ व १० धावांवर नाबाद आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%bf/
https://mahasports.in/due-to-rain-play-of-first-session-of-first-day-has-stopped-on-46-runs/
विराट कोहलीच्या नेतृत्वात चुका शोधून काढणाऱ्यांना जड्डूचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाला…