भारतीय संघाच्या कालच्या कामगिरीवर माजी कर्णधार सौरव गांगुलीने सडेतोड मतं व्यक्त केली आहे. अजिंक्य रहाणे हा वनडे सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू असून त्याला संघात संधी द्यायला हवी असे मत गांगुलीने व्यक्त केले आहे.
गांगुलीने अजिंक्य रहाणे आणि केएल राहुल यांच्या वनडे संघात समावेशाबद्दल म्हटले आहे, ” रहाणे आणि राहुल हे वनडेत चांगली कामगिरी करत आले आहेत. श्रेयस अय्यर आणि पांडे हे चांगले खेळाडू आहेत. परंतु संघाची गरज असताना त्या त्या खेळाडूला संधी दिली पाहिजे. “
“अजिंक्य रहाणे संघात हवाच कारण तो एक उच्च दर्जाचा खेळाडू आहे. त्याने गेल्या काही मालिकेत चांगल्या धावा जमवल्या आहेत. मी कसोटी आणि वनडे मालिकांची तुलना करू शकत नाही. परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा तो संघात हवाच. संघात विराट कोहली नसताना तर अजिंक्य रहाणे संघात हवाच आहे.”
अजिंक्य रहाणे भारताकडून ८४ वनडे खेळला असून त्यात त्याने २८२२ धावा केल्या आहेत.