भारताचा दिग्गज तुफानी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये अनेक अशे रेकाॅर्ड केले, जे अद्याप कोणताही फलंदाज तोडू शकला नाही. सेहवागनं त्या काळात त्याच्या आक्रमक फलंदाजीनं सर्वांना आपलंस केलं होतं. आपल्या झंझावाती फलंदाजीनं विरोधी गोलंदाजांमध्ये भीती निर्माण करणे ही सेहवागची सवय होती, पण कारकीर्दीत एकदा या विस्फोटक सलामीवीराला संघाबाहेर काढण्याची धमकी दिली होती.
2003 मध्ये सौरव गांगुली (Sourav Ganguly) भारतीय संघाचा कर्णधार होता. त्यावेळी त्यानं वीरेंद्र सेहवागला (Virender Sehwag) सांगितलं होतं की जर त्यानं धावा केल्या नाहीत तर तो त्याला संघातून बाहेर काढून टाकेल. भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रानं (Aakash Chopra) एकदा यूट्यूबवरील क्रिक कास्ट शो दरम्यान याचा खुलासा केला होता. ही घटना 2003 साली न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत घडली होती. आकाश चोप्रानं सांगितलं की, सौरव गांगुलीने वीरेंद्र सेहवागला सांगितले होते की, जर तुला संघात स्थान टिकवायचे असेल तर धावा कर.
आकाश चोप्रा म्हणाला होता की, “वीरेंद्र सेहवागनं त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप धावा केल्या, पण त्यानंतर त्याच्या कारकीर्दीत एक वाईट टप्पा आला. सेहवागच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. त्यानंतर भारताचा कर्णधार सौरव गांगुली वीरेंद्र सेहवागकडे गेला आणि म्हणाला की, जर तू धावा केल्या नाहीत तर मी तुला संघातून हाकलून देईन.”
पुढे बोलताना आकाश चोप्रा (Aakash Chopra) म्हणाला की, “विशेष म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात फ्लॉप झाल्यानंतर वीरेंद्र सेहवागनं मोहालीमध्ये कसोटी सामन्यात धमाकेदार शतक झळकावले आणि 130 धावा केल्या.”
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजानं लगावला चौकार अन् सूर्यानं मागितली माफी, कारण काय?
“जो रुटला दोन जन्म घ्यावे लागतील, विराटचा…”, चाहत्यांनी घेतला मायकल वॉनचा क्लास
RCB साठी आनंदाची बातमी! संघातील ‘या’ स्टार खेळाडूने ठोकले झंझावाती शतक