‘क्रिकेटचा दादा’ म्हणजेच भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि कर्णधार सौरव गांगुली. गांगुलीच्या कारकिर्दीत २२ जून या तारखेला खूप महत्व आहे. कारण की, १९९६ला याच दिवशी गांगुलीने भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गांगुलीने आपला पहिला कसोटी सामना लॉर्डसच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला होता. या सामन्यात त्याने आपले पहिले कसोटी शतकही मारले होते. त्याच्या कसोटी पदार्पणाला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिम्मित गांगुलीने एक किस्सा सांगितला, ज्यामध्ये भारताच्याच एका खेळाडूने त्याला मदत केल्याचे त्याने सांगितले.
स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने सांगितले की, “लॉर्ड्सचे मैदान माझ्यासाठी नेहमीच चांगले राहिले आहे. या मैदानाशी माझ्या खूप आठवणी जुडल्या आहेत. खूप कमी खेळाडूंना लॉर्ड्ससारख्या मैदानावर पदार्पण करण्याची संधी मिळते. मला अजूनही आठवते की, मी पॉइंटला क्षेत्ररक्षण करत होतो आणि संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी भरले होते. मी अजूनही लॉर्ड्सवर गेलो तर, सगळ्या आठवणी ताज्या होतात.”
गांगुलीने सांगितले की, “त्या सामन्यात मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला मिळाली होती. शनिवारी म्हणजेच सामन्याचा तिसऱ्या दिवशी मी शतक पूर्ण केले. या क्षणासारखी दुसरी गोष्ट अजून कुठलीच नसू शकते. यामागचे मुख्य कारण म्हणजे लॉर्ड्समध्ये बसलेला प्रेक्षकवर्ग माझ्या प्रत्येक फटक्याला टाळ्या वाजवत होता. चहापानाची वेळ झाली तेव्हा माझ्या १०० धावा पूर्ण झाल्या आणि मी ड्रेसिंग रूममध्ये गेलो.”
या गप्पागोष्टी दरम्यान, गांगुलीने सचिन तेंडुलकरसोबतचा एक किस्सा सांगितला. कसे सचिनमुळे आपली कसोटीत पदार्पणातील चिंता दूर झाली, याबद्दल त्याने उलगडा केला. “मला अजूनही आठवते की, चहापानाच्या वेळेस मी १०० धावांवर खेळत होतो आणि मी शरिरिक नव्हे तर मानसिकरीत्या जास्त दमलो होतो. कारण, माझा हा पहिलाच सामना होता आणि त्यात पहिले शतक. मी बॅटला चारही बाजूंनी टेप लावत होतो. कारण, आखूड टप्याचा आणि उसळत्या चेंडूमुळे बॅट नरम झाली होती. इतक्यात सचिन माझ्याजवळ आला आणि म्हणाला की,चहाचा घोट घे, आराम कर. मला अजूनही तो क्षण चांगलाच आठवतो. मी ड्रेसिंग रूममध्ये जात असताना सगळ्यांनी माझे अभिनंदनही केले होते,” असे गांगुलीने पुढे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेच्या अव्वल गोलंदाजाने शोधली पुजाराच्या फलंदाजीतील चूक, वाचा काय म्हणाला
क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी! ‘या’ टी२० लीगमध्ये युवराज, डिविलियर्स अन् गेल घालणार धुमाकूळ?
भारतातील पहिल्या ‘महिला’ क्रिकेट कोच, ज्यांनी ‘या’ भारतीय क्रिकेटरला शिकवली बॅट धरायला