पुणे, 10 जानेवारी 2023: लायन्स क्लब ऑफ पुणे 21 सेंच्युरी व स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लायन शंतनु सिध्दा यांच्या स्मरणार्थ लायन्स प्रौढ टी-20 क्रिकेट स्पर्धेत गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक संघाने सुप्रीम टायगर्स संघाचा पराभव करत विजयी सलामी दिली.
क्रिकेट नेक्स्ट अकादमी मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत उद्घाटनाच्या सामन्यात मनोहर पाटीलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक संघाने सुप्रीम टायगर्स संघाचा 5 गडी राखून पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा खेळताना भूषण देशपांडे , सचिन कापडे व मनोहर पाटील यांच्या अचूक गोलंदाजीने सुप्रीम टायगर्स संघाचा डाव 19.2 षटकात सर्वबाद 91 धावांत रोखला. यात प्रशांत भुरूकपाटीलने 22 तर ओस्वालने 24 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 91 धावांचे लक्ष प्रफुल्ल मानकरच्या 28, महेंद्र जगतापच्या 19 व सैरभ रवालीयाच्या नाबाद 16 धावांसह गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक संघाने केल 12.1 षटकात 5 बाद 92 धावा करून पुर्ण करत विजय संपादन केला. मनोहर पाटील सामनावीर ठरला.
स्पर्धेचे उद्घाटन लायन्स क्लब ऑफ पुणे 21 सेंच्युरीचे सर्व पदाधिकारी तसेच, स्पोर्ट्स डिस्ट्रिक्ट 3234 डी2चे अभिषेक मोहिते, समीर अगरवाल, डिस्ट्रिक्टचे कॅबिनेट ऑफिसर अल्पेश गुजराथी, झोन चेअरपर्सन समीर तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दत्ता शृंगारे व सनी मारवाडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
सुप्रीम टायगर्स- 19.2 षटकात सर्वबाद 91 धावा(प्रशांत भुरूकपाटील 22(20, 3×4 ), ओस्वाल 24(25, 3×4 ), भूषण देशपांडे 2-9, सचिन कापडे 2-17, मनोहर पाटील 2-21) पराभूत वि गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक- 12.1 षटकात 5 बाद 92 धावा (प्रफुल्ल मानकर 28(22, 5×4), महेंद्र जगताप 19(16,4×4 ), सैरभ रवालीया नाबाद 16(11, 35×4), अनिरूध्द ओक 3-13, शैलेश बुरसे 1-10) सामनावीर- मनोहर पाटील
गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक संघाने 5 गडी राखून सामना जिंकला. (Gargi Educon and Smart Tech team’s victory in the Lions Adult T20 Cricket Tournament)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेकॉर्डब्रेक सूर्या! आयसीसी क्रमवारीत पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी, विराटला कधी जमलेच नाही
पृथ्वी शॉनंतर अजिंक्य रहाणेची कॅप्टन्स इनिंग! निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर