---Advertisement---

भारतीय गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी वेस्ट इंडिजचा क्रिकेटर चालू सामन्यात येत असे स्टेडियमच्या बाहेर

On: सोमवार, जुलै 27, 2020 10:23 AM
---Advertisement---

भारतात अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहे. अशीही काही नावे आहेत, ज्यांनी लग्न केले नाही मात्र त्यांचे नाव अधिक काळ अभिनेत्रींशी जोडले गेले. अशा क्रिकेटपटूंमध्ये केवळ भारतीय खेळाडू नसून परदेशी खेळाडूही होते. बॉलिवूड अभिनेत्री अंजू महेंद्रू आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज माजी खेळाडू गॅरी सोबर्स यांची जोडी चांगलीच चर्चेत राहिली होती. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल गंभीर होते आणि त्यांनी साखरपुडाही केला होता. परंतु त्यांचे नाते अधिक काळ टिकू शकले नाही.

डांस पार्टीमध्ये सोबर्स यांनी केला होता प्रपोज

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अंजू महेंद्रूने (Anju Mahendru) सांगितले होते की, दोघांची भेट एका कॉमन मित्राच्या घरी एका पार्टीमध्ये डांस करताना झाली होती. येथूनच त्यांच्या दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली होती. अंजूने सांगितल्याप्रमाणे सर्वकाही खूप लवकर झाले होते. कोलकातामध्ये एका पार्टीदरम्यान सोबर्स यांनी तिला प्रपोज केला होता. प्रपोज करताना सोबर्स यांनी तिला अंगठी घातली होती. तिला ती अंगठी सोबर्स यांना परत द्यायची होती. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळीच सोबर्स लंडनला रवाना झाले होते.

सामन्यादरम्यान अंजूला भेटण्यासाठी सोबर्स थेट मैदानातून बाहेर येत असायचे

क्रिकेट मैदानातही सोबर्स (Sir Garry Sobers) आणि अंजूमधील प्रेमाने सर्व चाहत्यांमध्ये चर्चा असायच्या. अंजूने सांगितल्याप्रमाणे, सोबर्स त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला प्रत्येक सामन्यासाठी आमंत्रित करत होते. संघाचे उपकर्णधार असूनही ते सामन्यादरम्यान अंजूला भेटण्यासाठी मैदानातून बाहेर येत असायचे. सोबर्स यांची ही गोष्ट अंजूला खूप आवडली होती. सोबर्स आणि अंजूचे लग्न न झाल्यामुळे बॉलिवूडचे काही दिग्गज अंजूच्या पालकांची प्रशंसा करतात. असे म्हटले जाते की, अंजूच्या पालकांना तिचे हे नाते मान्य नव्हते. सोबर्स त्यावेळी फॉर्ममध्ये होते.

त्यांचे लग्न जरी झाले नसले, तरीही क्रिकेट आणि बॉलिवूडच्या लव्ह कपलमध्ये या जोडीचे नाव आताही घेतले जाते.

ब्रेकअपनंतर अंजूला ओळखण्यास दिला नकार

अंजूने सांगितल्याप्रमाणे, इंग्लंडमध्ये सोबर्स यांची भेट एका महिलेशी झाली होती, जिच्याबरोबर त्यांना लग्न करायचे होते. तिने सोबर्स यांना साखरपुडा तोडण्याचे पत्र पाठविले होते. त्यानंतर दोघेही वेगळे झाले होते. त्यानंतर एका पत्रकाराने सोबर्स यांना विचारले होते की, त्यांचे आणि अंजूचे नाते तुटले आहे का? यावर प्रत्युत्तर देताना सोबर्स यांनी म्हटले होते की, ते कोणत्याही अंजूला ओळखत नाहीत. तेव्हापासून स्पष्ट झाले होते की, सोबर्स आणि अंजू वेगळे झाले आहेत.

सोबर्स यांच्या नावावर आहेत बरेच विक्रम

सोबर्स यांच्या नावावर १९६८ मध्ये एक विक्रमाची नोंद झाली. त्यांनी इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅमशायर संघाकडून खेळताना ग्लेमॉर्गन के माल्कम नॅशच्या ६ चेंडूवर ६ षटकार ठोकले होते. त्यावेळी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हा कारनामा पहिल्यांदाच कोणत्याही खेळाडूने केला होता. त्यानंतर १९८५ साली रवी शास्त्री यांनी बडोदाच्या तिलकराजला ६ चेंडूत ६ षटकार ठोकत सोबर्स यांच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

ट्रेंडिंग घडामोडी-

-आयपीएलच्या तारखा समोर येताच सुरेश रैना आणि रिषभ पंत निघाले खरेदीला

-आयपीएलचे आयोजन दुबईत होत असल्याने महिला क्रिकेटरचे होणार मोठे नुकसान

-‘कुत्र्याचे शेपटू कधीच सरळ होणार नाही,’ माजी क्रिकेटपटूचा पाकिस्तानवर निशाना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---