गोल्ड कोस्ट | आॅस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बाॅक्सरनी आजचा दिवस गाजवला. सुरुवातीला मेरी कोमने 45-48 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर गौरव सोलंकीने पुरुषांच्या 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक तर मनीष कौशीकने 60 किलो वजनी गटात रौप्य पदक जिकंत आजचा दिवस गाजवला.
गौरव सोलंकीने 52 किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात नाॅर्थन आर्यलॅंडच्या ब्रॅंडन इरविनचा 4-1 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. पहिल्या दोन फेरीत गौरव सोलंकीचे एकतर्फी वर्चस्व होते. ब्रॅंडन इरविन तिसऱ्या फेरीत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला; पण त्याला अपयश आले.
मनीष कौशीकला 60 किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या हॅरी गरसाइडकडून 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.
याआधी मनीष कौशीकने 2017 मध्ये राष्ट्रीय बाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. तर इंडोनेशिया इथे झालेल्या आशिया स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते.
#GauravSolanki strikes Gold in the finals of men's flyweight (52-kilogram) category of #boxing in the ongoing 21st edition of the #CommonwealthGames #CWG2018
Read @ANI Story | https://t.co/LYPvM3PnzC pic.twitter.com/r6eOKpGac7
— ANI Digital (@ani_digital) April 14, 2018