---Advertisement---

अदानींची क्रिकेटजगतात एन्ट्री! या शहरात बांधणार तब्बल 60,000 कोटींचे स्टेडियम

On: शनिवार, ऑक्टोबर 8, 2022 7:44 PM
---Advertisement---

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अदानी उद्योगसमूहाच्या गौतम अदानी यांनी आता क्रीडा क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच अदानी स्पोर्ट्सलाईनच्या माध्यमातून त्यांनी दोन क्रिकेट लीगमधील संघांमध्ये गुंतवणूक केलीये. आता त्यांनी राजस्थानमधील उदयपूर या ठिकाणी तब्बल 60,000 कोटी रुपयांचा खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बांधण्याची घोषणा केली. राजस्थान सरकारसोबत याबाबतचे संपूर्ण करार झाल्याचे देखील त्यांनी म्हटले.

इन्वेस्ट राजस्थान समिटमध्ये बोलताना अदानी यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. ‘वैद्यकीय महाविद्यालये नसलेल्या दोन जिल्ह्यांमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. अदानी ग्रुप आणि अदानी फाउंडेशनच्या वतीने उदयपूरमध्ये नवीन क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्याशी चर्चा केली आहे.’

अदानी समूहाच्या अदानी स्पोर्ट्सलाइनने पुढील वर्षी होत होणाऱ्या इंटरनॅशनल लीग 20 मध्ये गल्फ जायंट्स फ्रँचायझी मिळवली आहे. ही त्यांची क्रिकेटजगतातील पहिली मोठी गुंतवणूक होती. दोन महिन्यांपूर्वी अदानी स्पोर्ट्सलाइनने लिजेंड्स लीग क्रिकेटमधील गुजरात जायंट्स घेतला हा संघ देखील विकत घेतला होता. मात्र, त्यांना अंतिम फेरीत जागा बनवण्यात अपयश आले.

मागील वर्षी आयपीएलमध्ये दोन नवे संघ सहभागी करून घेण्यात आले होते. त्यातील अहमदाबाद फ्रॅंचाईजीसाठी त्यांनी 5000 कोटी रुपयांची मोठी बोली लावलेली. मात्र, सीव्हीसी कॅपिटलने त्यांच्यापेक्षा तब्बल सहाशे कोटी रुपये अधिक बोली लावून फ्रॅंचायजी आपल्या नावे केली. त्यानंतर गुजरात टायटन्स या नावाने स्पर्धेत संघ उतरवत त्यांनी विजेतेपद देखील आपल्या नावे केले होते.   ‌

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शॉकिंग! विश्वचषकात ‘या’ दिग्गजाने भारतीय खेळाडूंना दिलेला सामन्यापूर्वी सेक्स करण्याचा सल्ला, वाचाच
पीएमडीटीए आयकॉन रोहित शिंदे टेनिस अकादमी स्पर्धेत अहान भट्टाचार्य, शर्विल गंगाखेडकर यांची आगेकूच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---