भारताचा माजी सलामीवीर आणि सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं आपल्या सर्वकालीन वर्ल्ड इलेव्हनची निवड केली आहे. गंभीरनं संघात त्या खेळाडूंना जागा दिली, ज्यांच्याविरुद्ध तो खेळला आहे. यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी तीन खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या दोन तर श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान दिलंय.
गंभीरनं ‘स्पोर्ट्सकीडा’वर आपली सर्वकालीन वर्ल्ड इलेव्हन जाहीर केली. या प्लेइंग 11 मधील एक नाव तुम्हाला आश्चर्यचकित करेल. हा दुसरा कोणी नसून भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या माजी वेगवान गोलंदाजाची नुकतीच टीम इंडियाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
गंभीरला विचारण्यात आलं की, तुम्ही ज्यांच्याविरुद्ध खेळला, अशा सर्वोत्तम 11 खेळाडूंची नावं सांगा. प्रत्युत्तरात, त्यानं सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्टचं नाव घेतलं. यानंतर त्यानं मॅथ्यू हेडनचा उल्लेख केला. यानंतर गंभीरनं एबी डिव्हिलियर्स, ब्रायन लारा आणि अँड्र्यू सायमंड्स यांचं नाव घेतलं.
याशिवाय गंभीरनं पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक, माजी अष्टपैलू अब्दुल रज्जाक आणि शोएब अख्तरची संघात निवड केली. अख्तर हा त्याच्या काळातील सर्वात घातक वेगवान गोलंदाज आहे. क्रिकेटमध्ये आजही सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. अख्तरनं 2003 मध्ये ताशी 161.3 किमी वेगाने चेंडू फेकला होता.
गौतम गंभीरची ऑल टाइम वर्ल्ड इलेव्हन : ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया), एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), ब्रायन लारा (वेस्ट इंडिज), अँड्र्यू सायमंड्स (ऑस्ट्रेलिया), इंझमाम-उल-हक (पाकिस्तान), अब्दुल रज्जाक (पाकिस्तान), मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका), शोएब अख्तर (पाकिस्तान), मॉर्ने मॉर्केल (दक्षिण आफ्रिका), अँड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड)
हेही वाचा –
बीसीसीआयची बल्ले-बल्ले! आयपीएलद्वारे इतक्या कोटींची कमाई, आकडा जाणून बसेल धक्का!
जय शाह बनणार आयसीसीचे नवे अध्यक्ष? लवकरच नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता
इंग्लंडमध्ये श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये आग! जिवाच्या आकांताने बाहेर पडले खेळाडू, नेमकं काय घडलं?