मुंबई । काल गौतम गंभीरने आपल्या मुलीच्या शाळेतील एक खास विडिओ शेअर केला होता. ज्यात त्याची मुलगी आझीन त्याला गोलंदाजी करत आहे.
याबरोबर त्याने एक खास ट्विट करत लिहिले होते की माझी मुलगी आझीनच्या गोलंदाजीचा सामना तिच्या शाळेत करणे खरंच कठीण काम आहे. शिवाय तिला माहित आहे की आपल्या वडिलांना यष्टीचा बाहेर चेंडू टाकावेत.
High pressure job facing my daughter Aazeen’s bowling at her school. Hell, even she knows d line has to be outside d off stump vs papa!!!😊😊 pic.twitter.com/DX8SJOiLpI
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) November 6, 2017
या ट्विटला तब्बल १८१८ रिट्विट आणि १५५८१ लाईक्स मिळाल्या. शिवाय ५०० रिप्लाय आले. परंतु त्यातील एक खास रिप्लाय होता बॉलीवूड किंग खान शाहरुख खानचा.
शाहरुख म्हणतो, ” तिला आपल्या केकेआर संघात गोलंदाज म्हणून घ्या! “
Get her to bowl for KKR please. Big hug. https://t.co/duNmtDKwPW
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 7, 2017
यावर गंभीरने पुन्हा ट्विट करत म्हटले, “शाहरुख भाई ती नक्की खेळेल परंतु त्यासाठी तुम्हाला तिच्या वाढदिवसाला नक्की यावं लागेल. ”
@iamsrk bhai have convinced Aazeen.My ‘Little Legend’ will bowl @KKRiders if u cum to her b’day party loaded wid M&Ms, Elsa&Anna toys. Deal?
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) November 7, 2017
शाहरुख खान हा केकेआर या आयपीएलमधील संघाचा सहमालक असून गौतम गंभीर संघाचा कर्णधार आहे. जेव्हा गौतम गंभीरला या संघाचे कर्णधार करण्यात आले तेव्हा कुणालाच या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता. परंतु आपण एक यशस्वी कर्णधार आहोत हे गंभीरने पुढे दाखवून दिले होते.
सध्या हा खेळाडू रणजी सामने खेळण्यात व्यस्त आहे.