भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत सोमवारी (27 मे) रोजी संपली. यादरम्यान गौतम गंभीर प्रशिक्षक पदाचा प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत गंभीर किंवा बीसीसीआयनं काहीही सांगितलेलं नाही. बीसीसीआय आणि गौतम गंभीरनं याबाबत मौन पाळलं आहे. सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर संपणार आहे. 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिके या दोन देशात टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) तिसरे आयपीएल विजेतेपद पटकवून देण्यात गोतम गंभीरनं मोलाचं योगदानं दिलं. बीसीसीआयकडे गंभीरशिवाय फारसा मजबूत पर्याय नाही. असे दिसत आहे. भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत रचनेची चांगली माहिती असलेल्या प्रशिक्षकाच्या शोधात आहोत, असेही बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह यांनी म्हटले आहे.
बीसीसीआयची नजर व्ही. व्ही. एस लक्ष्मणवर होती. पण हैदराबादच्या या माजी क्रिकेटपटूला प्रशिक्षक पदासाठी पूर्ण वेळ नाही. कारण लक्ष्मण सध्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे (NCA) प्रमुख आहेत.
बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, “वेळ मर्यादा ठीक आहे पण निर्णय घेण्यापूर्वी बोर्डाला आणखी काही वेळ लागू शकतो. सध्या भारतीय संघ टी20 विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहे. यानंतर वरिष्ठ खेळाडूंना श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर विश्रांती देण्यात येणार असून एनसीएचे वरिष्ठ प्रशिक्षक संघासोबत राहू शकतात. अशा स्थितीत घाई कशाची?”
केकेआरचा मालक शाहरुख खानचे गंभीरसोबत खूप जवळचे संबंध आहेत. त्यामुळे गंभीरला आयपीएल संघ सोडणे सोपे जाणार नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे गंभीरच्या प्रशिक्षकपदी निवड होण्याच्या शक्यतेवर न्यूयॉर्कमध्ये उपस्थित असलेल्या वरिष्ठ भारतीय खेळाडूंच्या मतांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
अर्रर्र… रियान परागनं हे काय केलं? युट्युबची सर्च हिस्ट्री झाली व्हायरल पाहा व्हिडीओ