मुंबई । भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. गौतम गंभीर नेहमी अनेक विषयांवर रोखठोक विधाने करत असल्याने चर्चेत येतो असतो. याच दरम्यान, त्याचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमधील गौतमचे चेहऱ्यावरील हावभाव गंभीर दिसून येत आहेत.
गौतम गंभीरच्या या ‘सीरियस लूक’वर युवराजसिंगने रविवारी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. गंभीरने त्याचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले की, “जर मी आऊट सिंगचा बॉल स्लिपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तर सरळ स्लिपमध्ये कॅचआऊट झाला असतो.” यासोबत त्याने एक हसणारा इमोजी देखील पोस्ट केला.
फोटोवर युवराजसिंग ट्रोल करत लिहले की, “कमीत कमी तुझी इमोजी तर स्माईलची आहे.” गौतम गंभीर आणि युवराज सिंग हे बरेच वर्ष भारतीय संघात एकत्र खेळले होते. 2007 साली झालेल्या टी-ट्वेंटी विश्वचषक आणि 2011 साली झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारताला विजेता बनवण्यासाठी गौतम गंभीर आणि युवराज सिंग या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
कोरोना व्हायरसच्या संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांनी दानशूरपणा दाखवत जनतेची मदत केली. गौतम गंभीर हा नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. भारतीय राजकारण आणि क्रिकेटच्या मुद्द्यावर नेहमी परखड मते मांडत असतो.