भारतीय संघाने बांगलादेशसोबत नुकतीच 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली. या मालिकेत भारताने बांगलादेशला क्लीन स्वीप केले. त्यानंतर दोन्ही संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताने बांगलादेशवर वर्चस्व गाजवत 3-0 ने मालिका आपल्या खिशात घातली. गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली भारतीय संघ सध्या चमकदार कामगिरी करत आहे. त्याआधी गंभीरने संघाच्या भविष्यासाठी एक गुप्त योजना सांगितली आहे.
पत्रकार परिषदेत बोलतना गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला, “आपण सर्वांना धरून ठेवले पाहिजे. जर संघ त्यांचा नैसर्गिक खेळ करून एका दिवसात 400-500 धावा करू शकतात तर का नाही? आम्हीही त्याच प्रकारे खेळू, अधिक जोखीम, अधिक अपयश. असे दिवस येतील जेव्हा आम्ही 100 वर सर्वबाद होऊ आणि मग आम्ही ते स्वीकारू. पण आम्ही आमच्या खेळाडूंना मैदानावर जोखीम पत्करून खेळण्यासाठी प्रोत्साहन देत राहू. आम्हाला खेळ असाच पुढे न्यायचा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्हाला निकाल मिळवायचा आहे.”
गौतम गंभीर (Gautam Gambhir) पुढे म्हणाला, “मी चेन्नईत सांगितले होते की, आम्हाला असा संघ बनवायचा आहे, जो एका दिवसात 400 धावा करू शकेल आणि 2 दिवसांत सामना ड्रॉ करेल. याला विकास म्हणतात. त्यालाच कसोटी क्रिकेट म्हणतात. आमच्याकडे ड्रेसिंग रूममध्ये बरेच खेळाडू आहेत जे 2 दिवस फलंदाजी करू शकतात. पण आमचे पहिले लक्ष्य सामना जिंकणे आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
PAK vs ENG; दुसऱ्या कसोटीत बाबरच्या जागी खेळणार ‘हा’ खेळाडू
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू
INDW vs NZW; एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक जाहीर…!