भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पुणे कसोटीपूर्वी बुधवारी (23 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली. त्यांनी केएल राहुलबाबतही प्रतिक्रिया दिली. गंभीरनं स्पष्ट केलं की, टीम मॅनेजमेंट राहुलला पाठिंबा देणार आहे. गंभीरनं राहुलच्या कानपूर कसोटीतील खेळीचा उल्लेख केला. राहुल बंगळुरू कसोटीत मात्र फ्लॉप झाला होता.
गौतम गंभीर पत्रकार परिषदेत म्हणाले, “सोशल मीडिया आमची प्लेइंग एलेव्हन ठरवत नाही. आमच्यासाठी हे महत्त्वाचं नाही की, सोशल मीडियावर तज्ञ काय विचार करतात. आमच्यासाठी महत्त्वाचं हे आहे की, टीम मॅनेजमेंट काय विचार करत आहे. त्यानं (राहुल) कानपूरच्या अवघड खेळपट्टीवर चांगली खेळी केली होती. तो मोठा स्कोर करण्याचा प्रयत्न करत आहे. टीम मॅनेजमेंट त्याला यासाठी पाठिंबा देईल”
भारतीय संघाला बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला होता. केएल राहुल या सामन्याच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात त्यानं केवळ 12 धावा केल्या. राहुलनं बांगलादेशविरुद्ध कानपूर कसोटीत अर्धशतक ठोकलं होतं. त्यानं 68 धावांची खेळी केली होती. आता त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग एलेव्हनमध्ये संधी मिळणार की नाही, हे गौतम गंभीरनं स्पष्ट केलेलं नाही.
केएल राहुलनं बंगळुरू कसोटीनंतर खेळपट्टीला नमस्कार केला होता. यानंतर त्याच्या निवृत्तीच्या अफवा उडाल्या होत्या. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात म्हटलं जात होतं की, राहुलनं भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. मात्र यावर राहुलकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती.
केएल राहुलनं भारतासाठी 53 कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्यानं 8 शतकं आणि 15 अर्धशतक ठोकली. त्यानं कसोटीमध्ये 2981 धावा केल्या आहेत. 199 हा त्याचा सर्वोत्कृष्ट स्कोर आहे.
हेही वाचा –
लखनऊच्या मॅनेजमेंटने कर्णधार केएल राहुलचा केला पत्ता कट, कारण ऐकून व्हाल थक्क..!
IND VS NZ; दुसऱ्या टेस्टपूर्वी शुबमन गिलचा नवा लूक समोर, पाहा व्हायरल फोटो
या अनुभवी फलंदाजाने रचला इतिहास; बांग्लादेशसाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच