येत्या ५ फेब्रुवारी पासून भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड विरुद्ध ४ कसोटी सामने खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पहिल्या २ कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड केली आहे. यात अक्षर पटेल याला स्थान देण्यात आले आहे. तसेच अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे पुनरागमन झाले आहे. अनेक माजी खेळाडू सामन्यापूर्वी आपले संभावित ११ खेळाडू निवडत असतात. त्याप्रमाणे माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर याने देखील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी आपला संभावित ११ खेळाडूंचा भारतीय संघ निवडला आहे.
पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच कसोटी मालिकेच्या शेवटी कळू शकेल की लॉर्ड्सच्या मैदानावर न्यूझीलंड संघाविरुद्ध जूनमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामना कोण खेळेल.
मयंक अगरवाल, हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर बाहेर तर अक्षर पटेल इन
गौतम गंभीर याने आपल्या संभावित ११ संघात मयंक अगरवाल, हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांना वगळले आहे. तसेच सध्या दुखापतग्रस्त असल्याने संघाबाहेर असलेल्या रवींद्र जडेजाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या अक्षर पटेलला त्याने आपल्या संभावित ११ खेळाडूंच्या यादीत समावेश केला आहे. अक्षर पटेल याने अजूनपर्यंत एकही कसोटी सामना नाही खेळला आहे. तरीसुद्धा गंभीर याने अक्षरला आपल्या संघात समाविष्ट केले आहे.
संघात ५ गोलंदाजांना दिले स्थान
मुख्यबाब म्हणजे गंभीरने आपल्या संघात ५ गोलंदाजांना स्थान दिले आहे. तसेच फलंदाज म्हणून शुबमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना निवडले आहे. तसेच अष्टपैलू खेळाडू म्हणून गंभीरने आर अश्विन आणि अक्षर पटेल यांना संघात स्थान दिले आहे.
तसेच गोलंदाजीसाठी कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज याला संघात समाविष्ट केले आहे. हार्दिक पंड्या गोलंदाजी करणार आहे की नाही यावर हा प्रश्न अजूनही कायम आहे आणि अक्षर पटेल डावखुऱ्या हाताचा गोलंदाज असल्यामुळे वॉशिंग्टन सुंदरच्या जागी पटेलला त्याने संघात समाविष्ट केले आहे.
पहिल्या कसोटीसाठी गौतम गंभीरचा संभावित ११ जणांचा खेळाडू
शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये खेळताना रोहित शर्माच्या मानधनात कशी झाली वाढ? घ्या जाणून