वनडे विश्वचषक 2023 संपून जवळपास दोन आठवडे झाले. पण चाहत्यांच्या डोक्यातील विश्वचषकाचे विचार अद्याप संपले नाहीत. भारतीय संघ अंतिम सामन्यात जाऊन ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाल्याने कोट्यावधी चाहत्यांच्या भावना दुखापल्या. विश्वचषकाच्या चर्चा सर्वत्र सुरू असताना भारताचा माजी दिग्गज गौतम गंभीर याने खास प्रतिक्रिया दिली. गंभीरने एका कार्यक्रमात विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंचा संघ निवडला आहे.
गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने आपल्या संघात उपविजेत्या भारताचे सर्वात जास्त चार खेळाडू आहेत. यावर्षी इतिहासातील सहावा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा केवळ एक खेळाडू संघात घेतला. दक्षिण आफ्रिका आणि आफगाणिस्तानचे प्रत्येकी दोन- दोन खेळाडू या संघात आहेत. तसेच विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघांप्रमाणेच न्यूझीलंडचा देखील फक्त एक खेळाडू या संघात आहे.
गंभीरने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांना सलामीवीर म्हणून निवडले आहेत. विराट कोहली, डॅरिल मिचेल आणि हेनरिक क्लासेन यांना मध्यक्रमात फलंदाजीसाठी निवडले गेले आहे. तसेच अष्टपैलूंच्या रुपात चार खेळाडूंना घेतले गेले आहे. ग्लेन मॅक्सवेल, अजमतुल्लाह ओमारजाई, मार्को यानसेन आणि राशिद खान, या अष्टपैलूंना गंभीरने संघात निवडले. वेगवान गोलंदाजाच्या रुपात विश्वचषक गाजवणारा मोहम्मद शमी आणि त्याच्या साथीला जसप्रीत बुमराह यांना गंभीरने निवडले. (Gautam Gambhir picks the best playing XI for ODI World Cup 2023)
गौतम गंभीरने निवडलेली विश्वचषकातील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन –
क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा, विराट कोहली, डॅरिल मिचेल, हेनरिक क्लासेन, ग्लेन मॅक्सवेल, अजमतुल्लाह ओमारजई, मार्को यानसेन, राशिद खान, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.
महत्वाच्या बातम्या –
तिसऱ्या टी20 पूर्वी सुट्टी घेत मुकेश कुमार पोहोचला घरी, ‘हे’ आहे कारण, चहर संघात सामील
INDvAUS: तिसऱ्या टी20 मध्ये टीम इंडियाची प्रथम फलंदाजी, अशी आहे प्लेईंग इलेव्हन