भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने 2-1 असा विजय मिळवत मालिका खिशात घातली. या मालिकेदरम्यान भारतीय संघासाठी महाराष्ट्राचा अनुभवी फलंदाज राहुल त्रिपाठी याने पदार्पण केले. पहिल्या सामन्यात खराब कामगिरी केल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्यानंतर, आता भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने त्याचे कौतुक केले आहे.
मागील जवळपास आठ वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट व आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या त्रिपाठी याला सहा महिन्यांपूर्वी भारतीय संघात प्रवेश मिळाला होता. मात्र, पदार्पण करण्यासाठी 2023 हे वर्ष उजेडावे पुणे येथील पहिल्या सामन्यात तो केवळ पाच धावा काढून बाद झाला. मात्र, राजकोट येथील सामन्यात त्याने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली. भारतीय संघाचा पहिला बळी पहिल्या षटकात गेल्यानंतर त्याने आक्रमक धोरण स्वीकारले. अवघ्या 16 चेंडूंमध्ये पाच चौकार व दोन षटकारांच्या मदतीने त्याने 35 धावा कुटल्या.
त्याच्या याच आक्रमक रूपाचे गौतम गंभीरने कौतुक केले. तो म्हणाला,
“राहुल त्रिपाठी असा फलंदाज आहे ज्याने सर्व क्रमांकावर आयपीएलमध्ये व देशांतर्गत क्रिकेटमध्ये फलंदाजी केली आहे. तो सलामीवीर, मधल्या फळीत तसेच फिनिशर म्हणून देखील भूमिका बजावतो. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी त्याची खेळण्याची पद्धत एकसारखीच असते. भारतीय संघाला अशाच खेळाडूंची गरज आहे.”
सध्या 31 वर्षांचा असलेला राहुल आत्तापर्यंत आपल्या कारकिर्दीत 125 टी20 सामने खेळला आहे. यात 2800 पेक्षा जास्त धावा त्याच्या नावे जमा आहेत. 2017 आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघासाठी खेळताना त्याने ओळख मिळवली होती. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद या संघांसाठीही त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली.
(Gautam Gambhir Praised Rahul Tripathi Approach)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘महाराष्ट्र केसरी’ला महिंद्रा थार जीपचे बक्षीस
सूर्याने सांगितले आपल्या ‘सिक्रेट कोच’चे नाव! दिले आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे श्रेय