भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा आपल्या विधानांमुळे सातत्याने चर्चेत असतो. परखड बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गंभीर याने नुकतेच एका मुलाखतीत बोलताना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्याविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
गौतम गंभीर हा सध्या आशिया चषक स्पर्धेमध्ये समालोचक म्हणून काम पाहत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यातही तो या भूमिकेत दिसला. त्यावेळी त्याने बोलताना धोनीविषयी अतिशय महत्त्वाची टिप्पणी केली. तो म्हणाला,
“एमएस धोनी हा भारतीय संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळला असता तर, वनडे क्रिकेटमध्ये सर्व विक्रम त्याच्या नावे असते. मात्र, संघाला विजयी मार्गावर आणण्यासाठी त्याने स्वतःहून खाली खेळण्यास सुरुवात केली. ज्याचा संघाला फायदा देखील झाला.”
धोनी याने सुरुवातीच्या काळात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना काही संस्मरणीय खेळ्या केल्या आहेत. पाकिस्तान विरुद्ध विशाखापट्टणम येथील 148 आणि जयपूर येथे श्रीलंकेविरुद्ध 182 या त्याच्या सर्वोत्तम खेळ्या याच क्रमांकावर आलेल्या. त्यानंतर भारतीय संघाचे नेतृत्व स्वीकारल्यावर त्याने फिनिशर म्हणून भूमिका बजावण्यास सुरुवात केली. त्याला वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर म्हणून ओळखले जाते.
गंभीर हा अनेकदा एमएस धोनी याच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना दिसतो. 2011 वनडे विश्वचषकातील अंतिम फेरीतील खेळीचे श्रेय आपल्याला मिळाले नसल्याचे त्याने अनेकदा बोलून दाखवले आहे. मात्र, त्याचवेळी रोहित शर्मा व विराट कोहली यांना वारंवार संधी दिल्यामुळे त्यांची कारकीर्द सावरण्यात धोनी याचा हात असल्याचे देखील तो कबूल करतो.
(Gautam Gambhir Said If MS Dhoni Played At 3 He Will Broke Many Records)
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषक भारतासाठी महत्वाचा कशामुळे? शुमबन गिलने वर्ल्डकपशी जोडला संबंध
वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानला ‘440 व्होल्टचा झटका’, नसीम शाह आख्ख्या स्पर्धेतून बाहेर!