भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. खास करून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो सर्वात्कृष्ट फलंदाज असल्याचे अनेक जण मानतात. आपल्या कारकिर्दीची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केल्यानंतर त्याने सलामीवीर म्हणून मोठे नाव कमावले. त्याच्या या आतापर्यंतच्या मोठ्या यशात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचा मोठा वाटा राहिल्याचे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने म्हटले आहे.
रोहित सध्या भारताच्या तिन्ही संघाच्या कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत जे काही कमावले त्यात मोठा वाटा धोनीचा असल्याचे गंभीरने स्पष्टपणे म्हटले. गंभीर म्हणाला,
“तुम्हाला कर्णधाराचा पाठिंबा नसेल तर तुम्ही फारसे काही करू शकत नाही. निवड समिती व संघ व्यवस्थापन हे देखील कर्णधाराच्या शब्दाच्या बाहेर नसतात. धोनीने रोहितवर सुरुवातीपासून विश्वास ठेवला होता. त्याला अनेकदा संधी दिली. त्याचाच परिणाम आपण आत्ता पाहत आहोत की रोहितची कारकीर्द कुठे आहे. यामध्ये धोनीची भूमिका महत्त्वाची राहिली.”
गंभीरने पुढे बोलताना रोहित कडून देखील अशीच अपेक्षा व्यक्त केली. तो म्हणाला,
“ज्याप्रकारे धोनीने रोहितला पाठिंबा दिला तसाच पाठिंबा रोहितने आता खेळाडूंना द्यायला हवा. शुबमन गिल, संजू सॅमसन यांच्यासारखे खेळाडू अधिकाधिक संधीसाठी पात्र ठरतात.”
मधल्या फळीत खेळणाऱ्या रोहितला धोनीने 2013 मध्ये सलामीवीर म्हणून बढती दिली होती. त्यानंतर त्याने सलामीवीर म्हणून भारतीय संघासाठी आत्तापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याचा समावेश भारताच्या सर्वकालीन महान सलामीवीरांमध्ये होतो.
(Gautam Gambhir Said MS Dhoni Play Vital Role In Rohit Sharma Career)
महत्वाच्या बातम्या –
बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! मोनिका पटेलला संधी, श्रेयंका पाटीलकडे दुर्लक्ष
वानखेडेवर रंगणार 2011 वर्ल्डकप फायनलचा रिमेक! असे आहे श्रीलंका संघाचे वेळापत्रक