भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकतीच 4 कसोटी सामन्याची बॉर्डर- गावसकर मालिका पार पडली आहे. ॲडलेड येथे पराभव पत्करावा लागल्यानंतरही भारतीय संघाने मालिकेत जबरदस्त पुनरागमन करत 2-1 ने विजय मिळवला. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयात युवा खेळाडूंनी विशेष महत्वाची भूमिका बजावली. प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे शुभमन गिल, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदरसारख्या युवा खेळाडूंना अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली व सर्वांनी उत्तम कामगिरी केली.
या सर्व खेळाडूंमध्ये युवा सलामीवीर शुभमन गिलने आपल्या खेळातून सर्वच क्रिकेट रसिकांची वाहवा मिळवली. मात्र अशातच भारताचे माजी सलामीवीर गौतम गंभीर यांची प्रतिक्रिया समोर येत असून, त्यांनी गिलचे कौतुक केले. सोबतच त्याला जास्त उंचावर न चढवण्याचा सल्लादेखील दिला.
एका कार्यक्रमादरम्यान गौतम गंभीर म्हणाले, “गिलने रोहित शर्मा सोबत सलामीला फलंदाजी करणे गरजेचे होते. याबाबत कुठलीही शंका नाही. मात्र आपण सर्वांनी इतक्या लवकर गिलबाबत निर्णय घ्यायला नको. कोणत्याही खेळाडूला इतक्या लवकर झाडावर चढवणे योग्य नाही. निश्चितच गिलकडे प्रतिभा आहे, पण त्याला नम्रपणे मेहनत करावी लागेल. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे फारच अवघड असते.”
गिलने कसोटी मालिकेत केल्यात २००हून अधिक धावा
गिलने ऑस्ट्रेलियात दौऱ्यात शानदार कामगिरी केली. मेलबर्न कसोटी सामन्यातून पदार्पण करणाऱ्या गिलने एकूण 6 डावात 2 अर्धशतकांसह 259 धावा केल्या. गिल ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.आत्मविश्वास वाढलेल्या गिलकडून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत देखील उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
लवकरच सुरू होणार भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका
भारत विरुद्ध इंग्लंड संघात 5 फ्रेबुवारीपासून चेन्नई येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. 9 फेब्रुवारी रोजी हा सामना संपेल. त्यानंतर 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान चेन्नईच्या मैदानावरच दुसरा कसोटी सामना पार पडले. 24 फेब्रुवारी आणि 4 मार्चपासून सुरु होणारे अखेरचे दोन कसोटी सामने अहमदाबाद येथे खेळवण्यात येतील.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ कारणामुळे कुलदीप ऐवजी सुंदरला दिली संघात जागा; अजिंक्य रहाणेने उलगडले रहस्य
“… तरच पृथ्वी शॉ करू शकेल भारतीय संघात पुनरागमन, इयान बिशप यांनी सांगितला पर्याय
AUS विरुद्ध अखेरच्या दोन कसोटीत भारतातून कॅप्टन्सी करत होता विराट? प्रशिक्षकाने केला खुलासा






