भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. व्हिडिओत दोन अद्न्यात व्यक्त कपिल यांना जळजबरीने घेऊन जाताना दिसत आहेत. स्वतः गौतम गंभीर याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे क्रिकेटप्रेमी मंडळी चांगलीच चिंतेत दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव () मोठ्या अडचणीत सापडल्याचे दिसते. दोन अद्न्यात व्यक्त कपिल यांना तोंड बांधून घेऊन जात आहेत. भारतीय दिग्गजाच्या अपहरणाचा व्हिडिओ पाहून वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.
गंभीरने या व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अजून कुणाला हा व्हिडिओ मिळाला आहे का? आशा आहे की, हे खरंच कपिल देव नसावे आणि ते सुखरून असतील.” गंभीरच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकजण अपिल यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत आहेत, तर काहींच्या मते हा व्हिडिओ एखाद्या व्यावसायिक शुटमधील आहे. अनेकांनी गंभीरने अशा पद्धतीचा व्हिडिओ शेअर केल्यामुळे त्याच्यावर देखील टीका करत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार कपिल देव यांचा हा व्हिडिओ एका जाहिरातीच्या शुटमधील आहे. पण अद्याप ही जाहिरात कोणती, हे स्पष्ट होऊ शकले नाहीये.
Anyone else received this clip, too? Hope it’s not actually @therealkapildev ????and that Kapil Paaji is fine! pic.twitter.com/KsIV33Dbmp
— Gautam Gambhir (@GautamGambhir) September 25, 2023
दरम्यान, भारतीय संघाने कपिल देव कर्णधार अशताना 1983 साली आपला वहिला आयसीसी वनडे विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतील दुबळा संघ म्हणून सुरुवात केल्यानंतर अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. अंतिम सामन्यात भारतापुढे त्यावेळी सर्वात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजचे आव्हान होते. भारताने हा सामना 43 धावांनी जिंकला होता. महिंदर अमरनाथ सामनावीर ठरले होते, ज्यांनी 26 धावांची खेळी केली होती, तर चेंडूने 3 विकेट्सचे महत्वपूर्ण योगदान दिले होते. (Gautam Gambhir shared the video of Kapil Dev’s kidnapping)
महत्वाच्या बातम्या –
‘बूम बूम’ बुमराहचा 2019 वर्ल्डकपमधला ‘तो’ रेकॉर्ड, अनेकांना माहितीच नाही; तुम्हीही घ्या जाणून
वनडे क्रिकेटच्या इतिहासात ‘असा’ जागतिक विक्रम करणारा भारत पहिलाच; भलेभले संघ जवळपासही नाहीत