भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर व सध्या समालोचक म्हणून आपली कारकीर्द घडवत असलेला गौतम गंभीर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. आपल्या आक्रमक वक्तव्यांसाठी तो नेहमी चर्चेत असतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान झालेल्या 2023 विश्वचषकाच्या सामन्यात त्याने तसेच एक वक्तव्य केले आहे जे सध्या चर्चेत असलेले दिसते.
गौतम गंभीर भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान समालोचन करत असताना त्याला 2019 विश्वचषकाबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावेळी भारतीय संघ मधल्या फळीच्या अपयशामुळे मागे पडल्याचे बोलले जाते. याच मुद्द्यावर बोलताना गंभीर म्हणाला,
“मला विचाराल तर ती निवडसमितीची जबाबदारी होती. त्यावेळची निवडसमिती आतापर्यंत भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात खराब निवडसमिती वाटते. अंबाती रायुडू सलग एक वर्षभर संघात असताना अखेरच्या वेळी बाहेर केला गेला. याला पूर्णपणे त्या वेळचे निवडसमिती अध्यक्ष जबाबदार होते. मात्र, मला खरंतर माहित नाही त्यावेळी अध्यक्ष कोण होते.”
त्यावेळी निवडसमिती अध्यक्षपद हे एमएसके प्रसाद यांच्याकडे होते. विशेष म्हणजे प्रसाद आणि गंभीर पुढील आयपीएलमध्ये लखनऊ संघासाठी एकत्रित काम करताना दिसतील.
त्यावेळी चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या रायडू याला डावलत अष्टपैलू विजय शंकर याला संघात निवडले गेलेले. स्पर्धेच्या टप्प्यात तो देखील दुखापतग्रस्त झाल्यानंतर रायडू याला संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, तेव्हा देखील रिषभ पंत याला संधी मिळाली. भारतीय संघाने या विश्वचषकात सातत्याने चौथ्या क्रमांकावर विविध खेळाडूंना आजमावून पाहिले होते. मात्र , कोणताच फलंदाज त्या क्रमांकावर न्याय न देऊ शकल्याने भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
(Gautam Gambhir Slams 2019 Indian Cricket Selection Committee And MSK Prasad)
हेही वाचा-
पाकिस्तानच्या पराभवानंतर चिडला शोएब अख्तर; म्हणाला, ‘बाबरमध्ये स्टॅमिना…’
वानखेडेवरील SA vs BAN सामन्यात खेळपट्टी कुणाची देणार साथ? वाचा हवामान ते आकडेवारीविषयी सर्वकाही