इंडियन प्रीमियर लीगच्या १० व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आयसीसी) फलंदाजांनी कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. एकावेळी आरसीबीने केवळ ९ धावांत २ गडी गमावले होते. परंतु, असे असूनही संघ २० षटकांत २०४ धावांपर्यत पोहोचला. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलने ४९ चेंडूत ७८ आणि डिव्हिलियर्सने ३४ चेंडूत नाबाद ७६ धावांची खेळी केली. आरसीबीने त्यांच्या खेळ्यांच्या जोरावर २०४ धावांची मजल मारली.
त्यामुळे आयपीएलमध्ये समालोचन करणारा केकेआरचा माजी कर्णधार गौतम गंभीर याने कोलकाताचा कर्णधार ओएन मॉर्गनवर जोरदार निशाणा साधला.
गौतम गंभीरने केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गनवर टीका करताना म्हटले की, दुसर्या षटकात दोन गडी गमावूनही आरसीबीने २०४ धावा बनविल्या यावर माझा विश्वास नाही. गौतम गंभीर याने यासाठी थेट ओएन मॉर्गनला दोष दिला. गंभीरच्या म्हणण्यानुसार मॉर्गनने मैदानावर चुकीचे निर्णय घेतल्याने केकेआरचे नुकसान झाले.
मॉर्गनविषयी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “पहिल्या दोन षटकात दोन बळी घेतले असताना आरसीबीच्या संघाने २०४ धावा केल्या, यावर माझा विश्वास नाही. मॉर्गनने पहिल्या षटकात दोन बळी घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीला गोलंदाजीतून हटवले. चक्रवर्तीची गोलंदाजी कायम ठेवलीअसती तर, कदाचित ग्लेन मॅक्सवेल बाद झाला असता.”
गंभीरने असेही म्हटले की, “मॉर्गनने १५ कोटी रुपये घेऊन सांगत असलेला गोलंदाज पॅट कमिन्सचा वापर व्यवस्थित केला नाही. कमिन्सने शेवटच्या षटकात डिव्हिलियर्सविरूद्ध गोलंदाजी केली असती. मात्र, कर्णधार मॉर्गनने आंद्रे रसेलला षटके दिली आणि त्याने २ षटकांत ३८ धावा दिल्या. इतकेच नाही तर, मॉर्गनने १९ वे षटक हरभजनसिंगला दिले, ज्याने त्या षटकात १८ धावा दिल्या.”
मॉर्गनचे नेतृत्व पाहिल्यानंतर गौतम गंभीर म्हणाला की, “हे चांगले आहे की कोणताही भारतीय क्रिकेटपटू केकेआरचा कर्णधार नाही. नाहीतर सोशल मीडियावर त्याच्याविरोधात पोस्ट सुरू झाल्या असत्या.”
गौतम गंभीरने २०११ ते २०१७ या काळात केकेआरचे नेतृत्व केले होते. त्याच्याच नेतृत्वात केकेआरने २०१२ व २०१४ च्या आयपीएलची विजेतेपदे पटकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईला मागे टाकत बंगलोरचा खास विक्रम, ‘या’ यादीत गाठले अव्वल स्थान
कर्णधार रनआउट झाला तर संघाचा पराभव नक्की? यंदाच्या आयपीएल मध्ये ‘हा’ आहे नवा फॉर्म्युला