दुबई येथे झालेल्या आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने पाच गड्यांनी विजय मिळवला. 148 धावांचे आव्हान पार करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. मात्र, कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी विराट कोहली यांनी जबाबदारीने खेळ करत 49 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र, हे दोघेही जम बसल्यानंतर एका षटकाच्या अंतराने माघारी परतले. त्याचवेळी विराट कोहली बाद झाल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू व समालोचक गौतम गंभीर याने विराटवर चांगलीच आगपाखड केली.
केएल राहुल पहिल्या षटकात बाद झाल्यानंतर रोहित व विराट यांनी 49 धावा काढल्या होत्या. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात रोहित बाद झाला. एका षटकानंतर विराटने देखील तोच प्रयत्न केला व बाद झाला. बाद होण्यापूर्वी विराटने 34 चेंडूवर 3 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या होत्या. एका चांगल्या सुरुवातीचा फायदा त्याला घेता आला नाही. याच कारणाने समालोचन करत असलेल्या गंभीरने आपली नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला,
“तुमचा कर्णधार नुकताच बाद होऊन गेल्यानंतर तुम्ही असा फटका कसा खेळू शकता? एखादा युवा खेळाडू हा फटका खेळला असता तर त्याच्यावर भरपूर टीका झाली असती. स्वतः विराटही खूप नाराज झाला असेल.”
गंभीर पुढे म्हणाला,
“आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने खूप धावा केल्या आहेत. मला खात्री आहे की तो जेव्हाही हा फटका पाहील तेव्हा त्याला वाटेल की अशा फटक्यांची गरज नव्हती.तुम्ही 34 चेंडूत 35 धावा केल्या, तुमचा कर्णधार नुकताच बाद झालाय. जर तुम्ही तुमची खेळी मोठी केली असती तर, तुमच्यासाठी गोष्टी सोप्या होऊ शकल्या असत्या.”
विराटने केलेल्या 35 धावा भारताकडून या डावातील सर्वोच्च धावा ठरल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने साध्य केलेल्या शिखराचे माजी दिग्गजाकडून कौतुक! म्हणाला, ‘तुला आणखी खेळताना…’
तयार रहा! रविवारी पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक थरार? अशी आहेत समीकरणे
हार्दिकच्या ‘कडक’ कामगिरीनंतर आनंदला माजी भारतीय क्रिकेटर; ट्विट करत म्हणाला…