यंदा 2021 मध्ये आयपीएलचा चौदावा हंगाम खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व आठ संघांनी कंबर कसली आहे. त्याचबरोबर संघ चौदाव्या हंगामासाठी आपल्या संघाची पुनर्बांधणी करताना दिसून येत आहे. तसेच चौदाव्या हंगामाच्या लिलावापूर्वी सर्व संघाना आपल्या संघात कायम ठेवलेल्या आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची होती. या कामासाठी सर्व संघाना 20 जानेवारी डेडलाईन देण्यात आली होती.
त्यामुळे सर्व संघानी आपल्या यादी जाहीर केली. त्याचबरोबर केकेआर संघाने सुद्धा आपली यादी जाहीर केली. ती यादी पाहून केकेआरचा माजी कर्णधार गौतम गंभीर आश्चर्यचकित झाला आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार राहिलेला गौतम गंभीर हा कुलदीप यादवला रिटेन केल्यामुळे आश्चर्यचकित झाला आहे. त्याचे म्हणणे आहे की, कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या फ्रेंचायजीने कुलदीप यादवला रिलीज करायला हवे होते. त्याच्या मते या फ्रेंचायजीने घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे.
कुलदीप यादवला आयपीएलच्या चौदाव्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून जास्त खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मागील हंगामात त्याला फक्त पाच सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या संघात आता वरुण चक्रवर्ती हा मुख्य फिरकीपटू म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे कुलदीप यादवला प्लेईंग इलेव्हन मध्ये खेळण्याची संधी मिळत नाही.
स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड या कार्यक्रमात गौतम गंभीरला म्हणाला की, त्याला वाटते कुलदीप यादवने दुसर्या संघातून खेळावे. ज्यामुळे त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळेल.
गौतम गंभीर म्हणाला, “मला खूप आश्चर्य झाले की, कुलदीप यादवला रिटेन केले. कारण त्याला जास्त संधी मिळाली नव्हती. मला वाटत होते की, कुलदीप यादवने अशा संघात जावे. ज्याठिकाणी त्याला बरोबरीची संधी मिळेल. कारण की, जर भारतीय संघासाठी खेळत असाल आणि आपली फ्रेंचायजी तुम्हाला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी नसेल, तर तुमच्या कारकिर्दीवर कुठे ना कुठे परिणाम होणार.”
गौतम गंभीर पुढे म्हणाला, “केकेआरने कुलदीप यादवला रिटेन केले आहे, तर मग त्याला संघातून सातत्याने खेळवले पाहिजे. नाही तर, कुलदीप यादवने स्वत:हून म्हणायला पाहिजे की, तो केकेआर संघाचा भाग नाही. तर मग त्याला दुसरीकडे जाउन खेळण्याची संधी मिळाली पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या:
विराटला नेतृत्त्वपदावरुन हटवाल, तर टीम इंडियाची परंपरा धुळीस मिळेल, दिग्गजाचे मोठे भाष्य
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी युवीसोबत हा सराव केल्याने झाला फायदा, शुबमन गिलने केला खुलासा
तुला वडिलांच्या कबरीजवळ पाहून माझं मन, सिराजच्या कृतीने अभिनेता धर्मेंद्रच्या डोळ्यात आणलं पाणी