Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सूर्याचे कौतुक करताना गंभीरने पुन्हा मारला विराटला अप्रत्यक्षरित्या टोला; म्हणाला…

November 4, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Virat Kohli & Gautam Gambhir

Photo Courtesy: BCCI/ Iplt20.com


ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात बुधवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान सुपर 12 फेरीतील सामना खेळला गेला. अखेरच्य चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 5 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपली जागा जवळपास पक्की केली. भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव याने पुन्हा एकदा मोलाची भूमिका बजावली. त्याच्या याच शानदार आणि सातत्यपूर्ण कामगिरीनंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने त्याचे कौतुक केले आहे.

संपूर्ण स्पर्धेत आत्तापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या सूर्यकुमारचे गंभीर सातत्याने कौतुक करत असतो. बांगलादेशविरुद्ध सामन्यानंतर बोलताना गंभीर म्हणाला,

“सूर्यकुमारची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची अपारंपारिक शैलीची फलंदाजी होय. त्याला आपण 360 डिग्री फलंदाज नाही म्हणायला पाहिजे. त्याच्याकडे इतकी प्रतिभा आहे की, तो काय करतो हे त्याला चांगले माहित आहे. त्याच्या आक्रमक शैलीमुळे तो सर्व संघांसाठी धोकादायक बनलाय.”

त्याचवेळी गंभीरने विराट कोहली याचे नाव न घेता म्हणाला,

“त्याच्याकडे इतर फलंदाजांसारखा कव्हर ड्राईव्ह नसेल मात्र त्याचा स्ट्राईक रेट इतर फलंदाजांपेक्षा चांगला आहे.” यापूर्वी देखील गंभीर अनेकदा विराटवर अप्रत्यक्षरीत्या टीका करताना दिसलेला. विराट या विश्वचषकात ‌भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे.‌ त्याने चारपैकी तीन सामन्यात अर्धशतके आहेत.

सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार या विश्वचषकात भारताचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी नेदरलँड्स व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार अर्धशतके ठोकली होती. त्यानंतर बांगलादेश विरुद्ध देखील त्याने केवळ 16 चेंडूंवर 30 धावा चोपलेल्या. टी20 विश्वचषकात सलग दोन सामन्यात अर्धशतके झळकावणारा तो केवळ दुसरा भारतीय फलंदाज आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

किवी संघाची टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सुपर एंट्री, न्यूझीलंडचा आयर्लंडवर 35 धावांनी विजय
हॅट्ट्रीक! आयर्लंडच्या जोशुआ लिटलने उधवस्त केली न्यूझीलंडची मिडल ऑर्डर, ठरला सहावाच गोलंदाज


Next Post
MS-Dhoni-and-Ravindra-Jadeja

जड्डू सीएसकेकडूनच खेळणार! खुद्द धोनीनेच केली मॅनेजमेंटशी बोलणी?

Suryakumar-Yadav-And-Virat-Kohli

विराट सूर्या अन् डिविलियर्ससारखे फँसी शॉट्स का खेळत नाही? कारण समजताच तुम्हीही व्हाल कोहलीचे फॅन

New-Zealand-Cricket-Team

मागच्या सात वर्षांत आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडचीच सत्ता! यंदा पुसणार का चोकर्सचा शिक्का?

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143