आशिया चषक 2023 मधील बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामन्याला शनिवारी (2 सप्टेंबर) सुरुवात झाली. कॅंडी येथे होत असलेल्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात अष्टपैलू शार्दुल ठाकूर याला संधी देण्यात आली आहे. मात्र, संघ व्यवस्थापन व कर्णधाराच्या या निर्णयावर माजी क्रिकेटपटू व समालोचक गौतम गंभीर याने व्यक्त केली.
या सामन्यासाठी भारतीय संघ तीन प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी यांच्यासह खेळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, संघ व्यवस्थापनाने शमी याच्या जागी अष्टपैलू शार्दुल ठाकूर याला संधी देत आपली फलंदाजी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय संघ आता दोन वेगवान गोलंदाज, दोन अष्टपैलू मध्यमगती गोलंदाज व दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरला आहे.
कर्णधाराच्या या निर्णयाशी गंभीरने मात्र असहमती दर्शवली. तो म्हणाला,
“शमी याला या सामन्यात संधी देणे गरजेचे होते. तीन प्रमुख गोलंदाज खेळणे आवश्यक आहे. विश्वचषकात देखील तुमचे हेच संयोजन असायला हवे. एक वेगवान गोलंदाज कमी करून अष्टपैलू खेळवता ही माझ्या दृष्टीने चूक आहे. पाकिस्तान त्यांच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांची छेडछाड कधीही करणार नाही.”
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना गंभीरने ठाकूर याच्या या संघातील जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. तसेच त्याला बीट्स अँड पीस खेळाडू संबोधलेले.
भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
(Gautam Gambhir Unhappy With Shardul Thakur Inclusion In India Playing XI)
हेही वाचाच-
बिग ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, बदलून टाकला कर्णधार; वाचा
‘ईशानने ओपन करावे तर, विराटने 4 नंबरवर फलंदाजी करावी’, भारतीय माजी खेळाडूचे वक्तव्य