---Advertisement---

भारतीय कसोटी संघाच्या यशात कोणाचा वाटा मोठा? गंभीर-विराटनं यांना दिलं श्रेय

On: बुधवार, सप्टेंबर 18, 2024 4:01 PM
Indian Test squad
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांची एक मुलाखत समोर आली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी प्रसिद्ध झालेली ही मुलाखत झपाट्यानं चर्चेत आली. मुलाखतीदरम्यान गंभीर आणि कोहली कसोटी क्रिकेटच्या महत्त्वावर बोलताना दिसले. गंभीरच्या मते, कोणत्याही देशाचं क्रिकेट हे सर्वात मजबूत तेव्हा असतं, जेव्हा त्याचा कसोटी संघ मजबूत असतो. यादरम्यान कोहलीही गंभीरच्या या वक्तव्याशी पूर्णपणे सहमत असल्याचं दिसलं. या दोघांनी भारतीय कसोटी गोलंदाजांचं कौतुक करत त्यांच्या योगदानाचं कौतुक केलं.

विराट कोहलीने पर्थच्या मैदानावर इशांत शर्मानं रिकी पाँटिंगला केलेल्या गोलंदाजीचा उल्लेख केला. त्यानंतर त्यानं जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचंही नाव घेतलं. कोहलीनं बुमराहचं सर्व फॉरमॅटमधील खेळाडू म्हणून वर्णन केलं. त्याचवेळी तो म्हणाला की, 100 कसोटी सामने खेळलेला इशांत शर्मा अजूनही त्याच लयीत गोलंदाजी करताना दिसतो. मोहम्मद शमीबाबत बोलताना कोहली म्हणाला की, तो मुळात टी20 गोलंदाज आहे. पण असं असूनही तो सध्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे.

कोहलीनंतर गौतम गंभीरनं देखील बुमराहचं कौतुक केलं. गंभीर म्हणाला की बुमराह सतत चांगली कामगिरी करू शकतो, कारण त्याला ते आवडतं. तुम्ही जे करत आहात त्यात तुम्हाला आराम वाटत नसेल तर तुम्ही कधीही चांगली कामगिरी करू शकत नाही.

या मुलाखतीदरम्यान गंभीरनं विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील योगदानाचं कौतुक केलं. गंभीरनं विराटच्या 2014-15 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील कामगिरी आठवली. त्या मालिकेत विराट कोहलीनं 4 कसोटी सामन्यात 86.50 च्या सरासरीनं एकूण 692 धावा केल्या होत्या.

यावेळी बोलताना गंभीरनं भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इतर आयसीसी स्पर्धा त्याच्यासाठी मोठं आव्हान असल्याचं सांगितलं. कोहलीचं कौतुक करताना गंभीर म्हणाला की, त्यानं संघातील युवा खेळाडूंसाठी जे वातावरण निर्माण केलं, ते अतिशय कौतुकास्पद आहे.

हेही वाचा – 

आयसीसी टी20 क्रमवारीत मोठा उलटफेर, आयपीएलमधील फ्लॉप खेळाडूची अव्वल स्थानी झेप
विराटनं महादेवाचं नाव घेत ऑस्ट्रेलियाचा बॅन्ड वाजवला, तर गंभीरनं हनुमान चालिसा ऐकत भारताला पराभवातून वाचवलं!
आयपीएल 2025 पूर्वी मोठी घडामोड, रिकी पॉन्टिंगची या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---