इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचं विजेतेपद चेन्नई सुपर किंग्स संघाने पटकावलं होतं. हे खरंच. मात्र, सर्वाधिक चर्चा कशाची झाली असेल, तर ती रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचा गोलंदाज नवीन उल हक याच्यातील वादाची. विराटशी वाद घालणाऱ्या अफगाणिस्तानच्या नवीन उल हक याने शनिवारी (दि. 23 सप्टेंबर) 24वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने भारतीय माजी दिग्गज गौतम गंभीरने नवीन उल हकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आता त्याच्या शुभेच्छा आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
गंभीरकडून नवीनला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक (Naveen Ul Haq) याचा फोटो शेअर केला. खरं तर, नवीन हा आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा खेळाडू आहे. तसेच, गंभीर हा संघाचा मेंटॉर आहे. गंभीरने हा फोटो शेअर करत लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा नवीन उल हक. तुझ्यासारखे खूप कमी लोक असतात, कधीच बदलू नको.”
https://www.instagram.com/p/CxhoX-Frev6/
आता गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांचा हा फोटो तसेच गंभीरच्या शुभेच्छा सर्वत्र व्हायरल होत आहेत. यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा आयपीएलची आठवणही झाली आहे. खरं तर, आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात लखनऊ विरुद्ध बेंगलोर संघातील एका सामन्यामुळे नवीन चर्चेत आला होता. झाले असे होते की, या सामन्यादरम्यान नवीन आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात बाचाबाची झाली होती. हा वाद एवढा वाढला होता की, यामध्ये गौतम गंभीरनेही उडी घेतली होती. या घटनेनंतर नवीन सातत्याने चर्चेत आला होता.
नवीन उल हक याची दीर्घ काळानंतर अफगाणिस्तानच्या वनडे संघात पुनरागमन झाले आहे. विशेष म्हणजे, वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेच्या स्क्वॉडमध्ये त्याची निवड केली गेली आहे. अशात चाहत्यांना आसा आहे की, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळेल. तसेच, पुन्हा एकदा विराट कोहली आणि नवीन उल हक (Virat Kohli And Naveen Ul Haq) एकमेकांपुढे येतील. (gautam gambhir wish naveen ul haq happy birthday photo goes to viral on social media)
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया एक पाऊल दूर, पण कशी असेल इंदोरची खेळपट्टी आणि हवामान?
भारतात डी कॉक खेळणार शेवटचा वनडे विश्वचषक! पाहा मागच्या दोन हंगामांमधील यष्टीरक्षक फलंदाजे रेकॉर्ड्स