तिरुवनंतपुरम । भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला पाठिंबा देताना लोक खेळाडू एकदा ३०वयाच्या पुढे गेला की प्रत्येक गोष्टीत चुका काढतात असे म्हटले आहे.
एनडीटीव्हीशी बोलताना गावसकर म्हणाले, ” व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकरला त्यांची मते मांडायचे स्वातंत्र्य आणि हक्क आहे. ते भरपूर क्रिकेट खेळले आहेत आणि त्यांच्या मतांमधून ते दिसते. आपण इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता वाट पाहायला हवी. ”
“जेव्हा कुणी वयाचा ३० चा टप्पा पार करते तेव्हा आपण सर्वजण त्या खेळाडूचा चुका शोधू लागतो. आपण तो खेळाडू किती लवकर निवृत्त होतो याचीच वाट पाहत असतो. ”
“आपण त्यावेळी ३० वयाच्या खालच्या खेळाडूंकडे पाहत नाही जे विशेष काही करत नाही. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण त्याच सामन्यात चांगली कामगिरी न केलेल्या खेळाडूंकडे पाहत नाही. आपण हार्दिक पंड्या लवकर बाद झाला त्याकडे पाहत नाही.”
“आपले सलामीवीर चांगले कामगिरी करू शकले नाही. आपण फक्त धोनीच्या चुकीकडे बोट दाखवतो. हे दुर्दैवी आहे. आणि असाच आपला देश आहे. ” असेही गावसकर पुढे म्हणाले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक टी२० सामना उद्या तिरुवनंतपुरममध्ये होणार आहे.