दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीने १५ जानेवारी रोजी भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा घेतला. अनेकांसाठी त्याच्या निर्णय धक्कादायक होता. यानंतर कसोटी कर्णधार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी रोहित शर्मा, केएल राहुल, रिषभ पंत या खेळाडूंची नावे समोर आली आहेत.
दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या आगोदर रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या नावाला कर्णधारपदासाठी सध्या जास्त पसंती दिली जात आहे. पण भारतीय संघाचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांचे असे मत आहे की रोहितकडे कसोटी संघाचे कर्णधारपद योग्य का ठरणार नाही.
गावसकर म्हणाले की, “रोहितची समस्या तंदुरुस्तीबाबत आहे. तुम्हाला असा खेळाडू हवा आहे, जो तिन्ही प्रकारामध्ये खेळताना तंदुरुस्त राहु शकेल आणि प्रत्येक सामन्यासाठी उपलब्ध असेल. श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजलाही अशीच हॅमस्ट्रिंगची समस्या होती. जेव्हा तुम्ही सामन्यादरम्यान झेल घेण्याचा किंवा वेगवान धावण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला दुखापत होते.”
अधिक वाचा – रोहितनंतर खुद्द सिनियर शर्माजींची मैदानावर जोरदार फटकेबाजी, वडिलांच्या फलंदाजीवर ‘हिटमॅन’ही फिदा
ते पुढे म्हणाले की, “मग असे झाले तर दुसऱ्या कोणाला तरी कर्णधार बनवावे लागेल. नंतर असे करण्यापेक्षा आत्ताच दुसऱ्या कोणाला तरी कर्णधार बनवलेले योग्य राहील. रोहितच्या या सततच्या दुखापतीमुळे त्याला कसोटी कर्णधार बनवले जाईल की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे. म्हणून मला वाटतं की, जो खेळाडू तिन्ही प्रकारामध्ये खेळण्यासाठी उपलब्ध आहे तोच कर्णधार झाला पाहिजे.”
व्हिडिओ पाहा – रोहित शर्माला टीम इंडियाचा वनडे कर्णधार करण्याचा निर्णय ‘या’ ४ कारणांमुळे चुकीचा
विराट कोहलीबद्दल बोलताना त्याने कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे, असे कौतुकही त्यांनी केले आहे. “दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका १-२ फरकाने भारतीय संघाने गमावली. नंतर आता कर्णधारपदावरून आपली हकालपट्टी होऊ शकते, याचा अंदाज विराट कोहलीला असल्याने त्या भीतीने त्याने हा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका भारत जिंकेल, असे वाटत होते, मात्र तो सामना भारत हरला. अशा स्थितीत हा निर्णय घेणे विराटला गरजेचे झाले होते”, असे मत गावसकरांनी व्यक्त केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
जोहान्सबर्गमधील पराभवानंतरही केएल राहुल करू इच्छितोय कसोटी संघाचे नेतृत्व; म्हणे, मी संघाला पुढे…
पराभवानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत पार्टी करत होता जो रूट, तितक्याच आले पोलिस अन्…, बघा व्हिडिओ
सचिनसोबत विक्रमी भागीदारी, ७ सामन्यात दोन द्विशतके, तरी कांबळीची अवघ्या २ वर्षात संपली कारकीर्द