पाचव्या दिवशी आज सकाळच्या सत्रात भारताने १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्यपदकाची कमाई केली आहे. भारताला १ सुवर्ण शुटींगमधून, १ रौप्य वेटलिफ्टींंगमधून तर १ कांस्यपदक शुटींगमधून आले आहे.
भारतीय महिला संघाने काल सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देत ऐतिहासिक कामगिरी केली.
अंतिम सामन्यात भारताच्या मोनिका बत्रानं ११-७, ११-४, ११-७ने विजय मिळवला. सिंगापूरला ३-१ असे पराभूत करत भारतीय संघाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.