कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022च्या स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहे. त्यातच ग्रुप इ आणि एफ मधील तर बलाढ्य संघ बाहेर झाले आहेत. शुक्रवारी (2 डिसेंबर) दोन सामने खेळले गेले. ज्यामधील एक संघ हरला असला तरी सुपर 16मध्ये पोहोचला, तर एक संघ असा जो सामना जिंकला असला तरी स्पर्धेबाहेर झाला आहे.
ग्रुप इ मध्ये दोन सामने खेळले गेले. ज्यातील पहिला सामना जपान विरुद्ध स्पेन असा होता. खलिफा इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात जपानने स्पेनला 2-1 असे पराभूत केले. या सामन्यातील पहिल्या सत्रात स्पेनने आघाडी मिळवली होती, मात्र जपानने उत्तम कामगिरी करत दुसऱ्या सत्रात दोन गोल केले आणि सामना जिंकला. या विजयाबरोबरच ते गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आले आणि अंतिम 16मध्ये धडाक्यात प्रवेश केला.
What a night! #FIFAWorldCup | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 1, 2022
दुसरा सामना अल बायत स्टेडियवर खेळला गेला. जो कोस्टा रिका विरुद्ध जर्मनी असा होता. या सामन्यात जर्मनीने 4-2 असा विजय मिळवला असला तरी ते अंतिम 16मध्ये पोहोचले नाही. त्याचबरोबर जर्मनी सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या (2018) साखळी फेरीतून बाहेर झाला आहे. या सामन्यात कोस्टा रिकाने दोन गोल केल्याने त्यांचे विश्वचषकात जर्मनीविरुद्ध एकूण 4 गोल झाले आहेत. विश्वचषकात सर्वाधिक गोल त्यांनी जर्मनीविरुद्ध करण्याचा विक्रम केला असून त्याच्याआधी त्यांनी 2014मध्ये उरुग्वे विरुद्ध 3 गोल केले होते.
हे दोन्ही सामने एकाच वेळी खेळले गेले. ज्यामुळे जपापने स्पेनला पराभूत करताच आणि जर्मनी विरुद्ध कोस्टा रिका सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असतानाच जर्मनी स्पर्धेबाहेर झाला. दोन्ही सामने संपले असताना स्पेन आणि जर्मनीचे अंक समान होते, मात्र गोल फरकाने स्पेन अंतिम 16साठी पात्र ठरला.
Group E we will never forget you. ❤️#FIFAWorldCup | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 1, 2022
या स्पर्धेत आतापर्यंत फ्रांस, पोर्तुगल, अर्जेंटिना, पोलंड, क्रोएशिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका, सेनेगल, स्पेन, जपान आणि मोरोक्को हे संघ अंतिम 16मध्ये पोहोचले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिफा विश्वचषकादरम्यान दु:खद बातमी, अर्जेंटिना क्लबच्या 22 वर्षीय फुटबॉलपटूचे निधन
आयपीएल 2023च्या लिलावाची तयारी सुरु, पाहा कोणत्या देशाचे खेळाडू सर्वात जास्त