घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित पार्वतीबाई बाबाजी सावंत फाउंडेशन पुरस्कृत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग २०२० पर्व ३ ची घोषणा करण्यात आली आहे. यंदा लीग मध्ये १० संघ सहभागी होणार आहेत. पहिले दोन पर्वात ८ संघ होते. दोन यशस्वी पर्वान नंतर यंदा २ संघ वाढवले आहेत.
९ एप्रिल ते १३ एप्रिल २०२० दरम्यान ही लीग स्पर्धा होणार असून संघ निवडीसाठी १४ मार्च २०२० खेळाडूंचा लिलाव होणार आहे. १० संघाचे १० संघमालक, १० प्रशिक्षक, १० व्यवस्थापक हे महत्त्वाचे दुवा असणार आहेत. १२ जणांचा मिळवून संघ निवडण्यासाठी संघमालक, संघ प्रशिक्षक, व्यवस्थापक याचं महत्वपूर्ण जबाबदारी असणार आहे. सर्व संघ प्रशिक्षक हे घाटकोपर प्रतिष्ठानने अधिकृत केलेले असणार आहेत. संघ व्यवस्थापक संघमालक आपल्या आवडीनुसार निवडून घेतले आहेत.
घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग २०२० पर्व ३ साठी पुढीलप्रमाणे असतील संघ, संघमालक, संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक
१) आर्यन वॉरियर्स
संघमालक: कु. आर्यन येवले
प्रशिक्षक: श्री. सुरेंद्र थोरवे
व्यवस्थापक: श्री. धमेंद्र चौरसिया
२) दिल्ली योद्धा
संघमालक: श्री. अमरजित सिंह
प्रशिक्षक: श्री. निलेश शिंदे
व्यवस्थापक: श्री. सचिन टेमकर
३) युवा प्रेरणा स्पोर्ट्स अकॅडमी
संघमालक: श्री. रमेश प्रभू
प्रशिक्षक: श्री. सतिश चव्हाण
व्यवस्थापक: श्री. प्रभाकर लकेश्री
४) राज-जानकी ब्लेसिंग बॉईज
संघमालक: श्री. प्रशांत गुरव
प्रशिक्षक: श्री. योगेश कांचन
व्यवस्थापक: श्री. सुरेंद्र धुरी
५) रुद्रा रायडर्स
संघमालक: श्री. राजेश पाडावे
प्रशिक्षक: श्री. सुदेश कुळे
व्यवस्थापक: कु. रोशन कदम
६) आई शिंब्रादेवी वॉरियर्स
संघमालक: श्री. जितेंद्र परब
प्रशिक्षक: श्री. निलेश उगले
व्यवस्थापक: कु. योगेश रेवाळे
७) देवांश सुपर किंग
संघमालक: श्री. दिनेश मेडेकर
प्रशिक्षक: श्री. सागर परब
व्यवस्थापक: श्री. किरण पवार
८) राजे चंद्रराव वॉरियर्स
संघमालक: श्री. अंकुश मोरे
प्रशिक्षक: श्री. सुरेश कासारे
व्यवस्थापक: श्री. आदेश वेलोंडे
९) राजे शिवछत्रपती वॉरियर्स
संघमालक: श्री. दीपेश सावंत व श्री राजेंद्र भोसले
प्रशिक्षक: श्री. किरण देवडिगा
व्यवस्थापक: श्री. संदेश शिंदे
१०) भटवाडी साईदर्शन पॅकर्स
संघमालक: श्री.गुरुनाथ सामंत
प्रशिक्षक: श्री सागर नार्वेकर
व्यवस्थापक: कु. शेखर नाईक