आयपीएलने अनेक क्रिकेटपटूंचे आयुष्य बदलले आहे. अनेक खेळाडूंची आयपीएलमधील चांगली कामगिरी पाहून भारतीय निवडकर्त्यानी अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिले आहे आणि खेळाडूंनी त्यासंधीचे सोनेही केले आहे. नुकतेच पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघात अशाच अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. या दौऱ्यासाठी नेट गोलंदाज म्हणून रवीश्रीनिवास साई किशोरयाची निवड करण्यात आली आहे.
याबाबत साईकिशोरचे असे म्हणणे आहे की इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्स संघात निवड होणे हे त्याच्या आयुष्यातील सर्वात सकारात्मक गोष्ट आहे.
रवीश्रीनिवास साई किशोर म्हणाला, “चेन्नई सुपर किंग्जबरोबर राहणे ही सर्वात सकारात्मक गोष्ट आहे, ज्यामुळे माझा खेळ सुधारला आहे. जर मी म्हटलो की, तुम्ही जेव्हा सर्वोत्तम खेळाडूंसोबत सराव करता तेव्हा आपल्या खेळात आपोआप सुधार येतो. ” साईकिशोर गेले २ वर्षे चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे.
तामिळनाडूच्या सय्यद मुश्ताक अली करंडक विजयासह रवीश्रीनिवास साई किशोरची कारकीर्द योग्य दिशेने प्रगती करीत असून त्यानंतर त्याला सीएसकेबरोबर आयपीएल करार मिळाला. रवीश्रीनिवास साई किशोरने नवीन गोष्टी शिकणे आणि जास्तीत जास्त माहिती गोळा केल्याने आज तो इथं पर्यंत पोहोचला आहे.
रवीश्रीनिवास साई किशोरने लिस्ट ए क्रिकेटमध्ये २५ सामन्यांमध्ये ४.५७ च्या इकॉनॉमीने ४५ विकेट्स घेतल्या आहे. त्याने आतापर्यंत ३० टी-२० सामने खेळले आहे व त्यात ५.२८ च्या इकॉनॉमिने ३३ विकेट्स घेतल्या आहे. रवीश्रीनिवास साई किशोर हा २०१८-२०१९ मध्ये तामिळनाडूसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता, त्याने ६ सामन्यात २२ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
एन्गिडी आणि नॉर्कीएचा कहर! वेस्ट इंडीजचा उडविला ९७ धावांत खुर्दा, दक्षिण आफ्रिकेला मिळाली आघाडी
‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह आहे कोट्यावधी रुपयांचा मालक, कमाई पाहून व्हाल थक्क
इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीचा दर्शकांनी लुटला भरपूर आनंद, ‘बियर स्नेक’चा व्हिडिओ भन्नाट व्हायरल