2023 वर्ष संपले आले आहे आणि गेल्या वर्षी भारतीय संघासाठी अनेक खेळाडूंची कामगिरी जबरदस्त होती, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या दिग्गजांच्या नावाचाही समावेश आहे. परंतु, माजी भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांनी युवा शुबमन गिल याला भारतासाठी 2023 चा ‘ब्रेकआउट परफॉर्मर’ म्हणून निवडले आहे.
24 वर्षीय शुबमन गिल (Shubman Gill) याने गेल्या 2023 वर्षी एकदिवसीय फॉर्मेटमध्ये सर्वाधिक यश संपादन केले आणि तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही होता. गिलने 29 सामन्यांमध्ये 60 पेक्षा जास्त सरासरीने 1584 धावा केल्या, ज्यात 5 शतके आणि 9 अर्धशतकांचाही समावेश आहे. या काळात त्याने द्विशतकही झळकावले. गिलसाठी कसोटी आणि टी20 फॉरमॅट इतके खास राहिलेले नाही. कसोटीत गिलने 6 सामन्यांच्या 10 डावात केवळ 258 धावा केल्या, तर टी20 मध्ये 13 सामन्यात त्याच्या बॅटमधून केवळ 312 धावा निघाल्या.
स्टार स्पोर्ट्स शो ‘फॉलो द ब्लूज’ मध्ये सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांना 2023 मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित करणार्या भारतीय खेळाडूची निवड करण्यास सांगितले होते, त्यावेळी त्यांनी शुबमन गिलचं नाव घेतलं, ते म्हणाले, “2023 च्या हंगामात खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यासाठी ‘ब्रेकआउट परफॉर्मर’ माझ्या मते शुबमन गिल असेल. कसोटी क्रिकेटच्या सुरुवातीला त्याला रोखणे अशक्य होते. शेवटी तो कसोटी क्रिकेटमध्ये मागे पडला पण एकदिवसीय आणि टी20 मध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली. त्यामुळे पुरुष संघाचा विचार केला तर तो ब्रेकआउट परफॉर्मर असेल.” (Giants pick Gill as breakout performer of 2023 praises big story)
हेही वाचा
पाकिस्तानने केली नवीन गोलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा, माजी दिग्गज सांभाळणार जबाबदारी
भारताविरुद्धच्या WTC फायनलपूर्वीच वॉर्नर घेणार होता निवृत्ती, ‘या’ कारणामुळे बदलला निर्णय