---Advertisement---

सुवर्ण चढाईत ओम कबड्डी संघाला गिरीश इरणकने मिळवून दिला विजय, असे होणार उपांत्य फेरी सामने

On: सोमवार, फेब्रुवारी 25, 2019 12:10 PM
---Advertisement---

वंदनीय हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिंदे गाव, मराठी शाळेच्या मैदानात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व नाशिक जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय श्री रेणुका फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ शिंदे गाव यांच्या विद्यमाने आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरुष गट आमंत्रित कबड्डी स्पर्धा सुरू आहेत.

काळ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामना एन.टी.पी.एस. नंदुरबार विरुद्ध ब्रम्हां स्पो आडगाव यांच्यात झाला. दादा आव्हाडच्या नेतृत्वाखाली नंदुरबारच्या संघाने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत आघाडी मिळवली. मध्यंतरापर्यत २४-०७ अशी आघाडी नंदुरबार संघाकडे होती. नंदुरबार संघाने ४१-२२ आता एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

ओम कबड्डी संघ कल्याण विरुद्ध जयहिंद अहमदनगर यांच्यात चुरशीची लढत झाली. ओम कल्याण संघाने सुवर्णचढाई मध्ये हा सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतरा पर्यत जयहिंद संघाकडे १७-१० अशी आघाडी असूनही सामना २८-२८ असा बरोबरीत राहिला. ५-५ चढाईत दोन्ही संघांनी ५-५ गुण मिळवत पुन्हा बरोबरी साधली. सुवर्णचढाई मध्ये ओम कल्याण संघाचा कर्णधार गिरीश इरणकने बोनस गुण मिळवत विजय मिळवून दिला.

सिंहगड पुणे विरुद्ध आझाद अहमदनगर यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सिंहगड पुणे संघाने ४१-२८ असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. तर शिवशंकर कल्याण संघाने उत्कर्ष पुणेचा ३९-२० असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या आधी उपउपांत्यपूर्व फेरीच्या चार लढती झाल्या होत्या.

उपांत्य सामने:-
१) एन. टी. पी. एस. नंदुरबार विरुद्ध शिवशंकर कल्याण
२) सिंहगड पुणे विरुद्ध ओम कबड्डी संघ कल्याण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment