---Advertisement---

‘तुझी आभारी आहे…,’ बड्डे बॉय केएल राहुलला गर्लफ्रेंड अथिया शेट्टीने दिल्या खास शुभेच्छा

On: रविवार, एप्रिल 18, 2021 5:35 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा खेळाडू केएल राहुल हा आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्याबद्दल खूप लोकांनी त्याला त्याच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या असून त्यामध्ये सुनील शेट्टीची मुलगी आणि राहुलची प्रेयसी अथिया शेट्टीनेही त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

अथियाने राहुलच्या वाढदिवसानिमित्त स्वतःचा आणि राहुलचा असे दोन फोटो शेअर केले आहेत. त्याखाली ‘मी तुझी खूप आभारी आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ असे लिहिले आहे.

क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या बर्‍याच दिवसांपासून डेटिंगच्या चर्चा चालू आहेत. तसेच दोघेही बऱ्याचदा एकमेकांच्या इंस्टाग्राम पोस्टवर प्रतिक्रिया देताना दिसले आहेत. या दोघांचा सुट्टीच्या दिवसांतील थायलंडमधील एक फोटोही समोर आला होता.

https://www.instagram.com/p/CNzH2XRnupL/?igshid=1r1bmbl7g257q

 

अथियाबरोबरच राहुलचा जवळचा मित्र हार्दिक पांड्या यांच्यासह अनेक खेळाडूंनी केएल राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पांड्याने राहुलचा आणि स्वतःचा एक फोटो पोस्ट करत ‘सुखात आणि दु:खात नेहमी सोबत, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा’ असे लिहले आहे.

https://www.instagram.com/p/CNzKH6nFabC/?igshid=kyndfz3g8wva

त्याबरोबर कर्नाटकचा माजी खेळाडू डोड्डा गणेशने राहुलच्या सुरुवातीच्या दिवसांचा फोटो शेअर करत ‘मी या युवा खेळाडूला एनसीएमध्ये प्रथम 2009 साली पाहिले होते आणि शॉट्स खेळण्याचा त्याचा वेळ पाहून खूप प्रभावित झालो होतो. काही वर्षांनंतर त्याने रणजीचे विजेतेपद जिंकले आणि त्यानंतर तो भारतीय संघाचा भाग झाला. तेव्हापासून त्याने कधी मागे वळून पाहिले नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा केएल राहुल.’ असे लिहले आहे.

https://twitter.com/doddaganesha/status/1383625881164271625?s=20

तसेच त्याला त्याचा आयपीएल संघ पंजाब किंग्जनेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

मॉर्गनविरुद्ध गेल्या ७ सामन्यात पहिल्यांदाच विराटने जिंकला टॉस, दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

चेन्नई-पंजाब सामन्यानंतर एमएस धोनीने दिला ‘हा’ सल्ला, शाहरुख खानने केला खुलासा

गोलमाल है भाई, सब गोलमाल है! नटराजनला संघाबाहेर ठेवण्याबाबत मूडी आणि लक्ष्मणचे वेगवेगळे विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---