सध्याच्या भारतीय संघात मॅचविनर खेळाडूंची कमतरता नाही. आजही भारतीय क्रिकेट संघामध्ये इतके चांगलले खेळलाडू आहेत की दोन संघ वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र खेळताना विरोधी संघाला धूळ चारताना दिसतात. अशा परिस्थितीत भारतासाठी अनेक खेळलाडू महत्वाचे आहेत यातील एका खेळाडूबद्दल ऑस्ट्रेलियन दिग्गज ग्लेन मॅक्ग्रा याने मोठे विधान केले आहे.
दुखापतीतून पुनरागमन केल्यापासून, त्याने बॅट, बॉल आणि क्षेत्ररक्षण या सर्व विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पंड्यासारखा खेळाडू कोणत्याही संघासाठी संपत्ती असतो. असे मतं महान ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने व्यक्त केले आहे. त्याने पंड्याचे कौतुक करत तो ‘टू इन वन’ खेळाडू असल्याचे म्हटले आहे. पंड्याच्या अष्टपैलू कौशल्यामुळे त्याला एक मजबूत खेळाडू म्हणून ओळख मिळाली आहे, असा त्याचा विश्वास आहे.
मॅकग्रा म्हणाला की, “क्रिकेट हा खूप आत्मविश्वासपूर्ण खेळ आहे. हार्दिक हा खूप आत्मविश्वास असलेला खेळाडू आहे. जर तो चांगली गोलंदाजी करत असेल, तर त्याचा त्याच्या फलंदाजीवर सकारात्मक परिणाम होतो. तो ‘टू इन वन’ खेळाडू आहे. तो लक्झरी आहे. चांगला, बुद्धिमान गोलंदाज आणि शक्तिशाली हिटर. तो एक चांगला गेम प्लॅन निर्माता आहे.” एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्याबद्दल बोलताना मॅकग्राने कबूल केले की, “टी -२० च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे ५० षटकांच्या फॉरमॅटला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. कसोटी क्रिकेट हे त्याचे आवडते स्वरूप असले तरी एकदिवसीय क्रिकेट रोमांचक ठेवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.”
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा यांचे संघात स्थान निश्चित झाले आहे. हे सर्व खेळाडू किमान २०२३विश्वचषकापर्यंत संघाचा अविभाज्य भाग असतील आणि भारतासाठी आयससी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करतील. या अव्वल हार्दिक पंड्या हा पुन्हा एकदा भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनला आहे.
दरम्यान, नुकतेच आशिया चषक २०२२चे वेळापत्रक जाहिर झाले आहे. अशातच टी-२० विश्वचषकापूर्वी होणारा आशिया चषक महत्वाचा ठरणार आहे. या स्पर्धेत भारतासाठी अनेक फिनिशर तयार होत आहेत. मात्र, एक अष्टपेलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. त्यामुळेच त्याच्याबद्दल अनेक जणांची वेगवेगळी मते असतील तरीही प्रत्येक जण त्याला संघात स्थान मिळावे यासाठी सकारात्मक असल्याचे पाहायला मिळते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘शराबी’ अनुष्का शर्मा! व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस
बिग ब्रेकिंग! आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर, कट्टर प्रतिस्पर्धींविरुद्ध भारत खेळणार पहिलीच लढत
आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी मिळवणारा माही आता कॉमनवेल्थमध्येही ठरतोय ‘एक्स फॅक्टर’