भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून (20 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना मोहालीत होणार आहे. यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये उजव्या हाताने फलंदाजी करणारा मॅक्सवेल डाव्या हाताने फलंदाजी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाच्या नेट सेशनचा असून, तो खास करून फिरकी गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके मारताना दिसतोय.
मॅक्सवेल हा टी20 क्रिकेटमधील स्पेशालिस्ट फलंदाज आहे. क्रिकेटच्या या प्रकारात रिव्हर्स स्वीप, स्विच हिट असे फटके खेळायला तो कचरत नाही. आयपीएलमधील अनेक सामन्यांमध्ये त्याने ही कामगिरी केली आहे. मॅक्सवेल स्थिरावल्यानंतर त्याला रोखणे कोणत्याही संघाला सोपे नसते. भारतासाठीही तो धोकादायक ठरू शकतो. कारण त्याला भारतात खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो आयपीएल खेळतोय. भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजीचा तो महत्त्वाचा भाग आहे.
Maxwell bats left-handed in the nets pic.twitter.com/g8pvMxwqXF
— Aritra Mukherjee (@aritram029) September 19, 2022
मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉइनिस यांनी दुखापतींमुळे दौऱ्यातून माघार घेतल्याने अष्टपैलू म्हणून मॅक्सवेलची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे ती कसून तयारी करतोय.
मॅक्सवेलचा अलीकडचा टी20 फॉर्म फारसा चांगला नाही. जूनमध्ये श्रीलंका दौऱ्यावर त्याने शेवटची टी20 मालिका खेळली होती. या मालिकेतील 3 सामन्यात त्याने फक्त 35 धावा केल्या. या वर्षी तो 8 टी20 खेळला असून एकाही सामन्यात त्याला अर्धशतक झळकावता आलेले नाही. 48 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. मात्र, भारत दौऱ्यापूर्वी त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या 3 वनडे मालिकेत चांगली गोलंदाजी केली आणि एका सामन्यात 52 धावांत 4 बळी घेतले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पत्रकारावर का भडकला रोहित? प्रेस कॉन्फरन्समध्ये नक्की काय घडलं?
जडेजाची रिप्लेसमेंट मिळाली! संघाला आपल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने जिंकून देणार सामना, कर्णधाराचे बडेबोल
का खास आहे टीम इंडियाची नवी ‘हर फॅन की जर्सी’? वाचा सविस्तर